कारमधून रॉयल एन्ट्री अन् ‘झापुक झुपूक’वर धम्माल डान्स! सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यातील Video तुफान व्हायरल

Asavari Khedekar Burumbadkar

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेलं आणि अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेलं नाव म्हणजे रियालिटी शोचा स्पर्धक सूरज चव्हाण. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे आणि सहज वागण्यामुळे सूरजने प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली असून आज अखेर तो विवाहबंधनात अडकत आहे. सासवड–जेजुरी रोडवरील माऊली गार्डन हॉल येथे आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. सकाळपासूनच लग्नस्थळी उत्साहाचे वातावरण असून याचदरम्यान सूरजच्या लग्नसोहळ्यातील एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओत

या व्हिडिओमध्ये सूरज कारमधून लग्नाच्या मंडपात प्रवेश करताना दिसतो. गाडीमधून उतरताच त्याने झापुक झुपूक या गाण्यावर बेभान होऊन डान्स केला आणि उपस्थित मंडळींनीही टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. त्याची ही एंट्री अगदी सिनेमॅटिक अंदाजात झाल्यामुळे तो व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला. लग्नाआधी सूरजने आपल्या नव्या घरात गृहप्रवेशाचा सोहळा पार पाडला होता. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम आणि रात्री संगीताचा जल्लोष झाला. या तिन्ही कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर ट्रेंडिंगला

आज सूरज आणि संजना सात फेरे घेऊन एकमेकांचे होणार आहेत. बिग बॉसमधील प्रवासापासून ते लग्नाच्या तयारीपर्यंत सूरजला चाहत्यांनी भरभरून साथ दिली आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाशी संबंधित पोस्ट्स ट्रेंड होत असून चाहते या नवदांपत्याच्या लग्नाच्या छायाचित्रांची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्या