भारतात यूट्यूब हे केवळ मनोरंजनाचं नाही तर कमाईचंही मोठं माध्यम बनलं आहे. विविध प्रकारच्या कंटेंटमुळे अनेक यूट्यूबर्स घराघरात पोहोचले आहेत. पण यामध्ये एक नाव सर्वांत वर आहे. तन्मय भट्ट (Tanmay Bhat). याने सर्वांना मागे टाकत 665 कोटी रुपयांच्या नेटवर्थसह भारतातील सर्वात श्रीमंत यूट्यूबरचा किताब पटकावला आहे. तन्मय भट्ट केवळ यूट्यूबर नाही, तर एक कॉमेडियन, अभिनेता, परफॉर्मर, प्रोड्यूसर आणि स्क्रिप्ट रायटर देखील आहे. 23 जून 1987 रोजी जन्मलेल्या तन्मयने स्टँड-अप कॉमेडी, पॉडकास्ट्स आणि डिजिटल शोमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्याच्या कंटेंटमध्ये मुख्यतः कॉमेडी, कोलॅबोरेशन्स आणि मनोरंजन असते, जे विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तो एका डिजिटल कंपनीचा सह-संस्थापक असून, अलीकडेच ‘कौन बनेगा करोड़पति’ या प्रसिद्ध टीव्ही शोमध्येही झळकला होता.

भारतातील टॉप 10 श्रीमंत यूट्यूबर्स: Tanmay Bhat
1. तन्मय भट्ट – ₹665 कोटी
2. टेक्निकल गुरुजी – ₹365 कोटी
3. समय रैना– ₹140 कोटी
4. कॅरी मिनाटी – ₹131 कोटी
5. बीबी की वाइन्स– ₹122 कोटी
6. अमित भडाना – ₹80 कोटी
7. ट्रिगर्ड इंसान– ₹65 कोटी
8. ध्रुव राठी – ₹60 कोटी
9. बीयर बायसेप्स (रणवीर शो) – ₹58 कोटी
10. सौरव जोशी व्लॉग्स – ₹50 कोटी
या यादीवरून स्पष्ट होते की डिजिटल कंटेंट, विशेषतः कॉमेडी आणि इन्फोटेन्मेंट, आजच्या काळात सर्वाधिक पैसे कमावण्याचं माध्यम बनलं आहे.
तन्मय भट्टच्या यशामागील रहस्य
तन्मयचा (Tanmay Bhat) यशस्वी प्रवास हा त्याच्या हटके विचारसरणी आणि प्रेक्षकांशी असलेल्या थेट संवादामुळे घडला आहे. त्याचे पॉडकास्ट्स, स्टँड-अप शोज, यूट्यूब शॉर्ट्स आणि लांब व्हिडिओजद्वारे तो सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहतो. त्याच्या विनोदी शैलीने आणि स्पष्ट मांडणीने तो तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्याची सक्रियता, ट्रेंडिंग विषयांवरील प्रतिक्रिया आणि थेट चाहत्यांशी संवाद यामुळे त्याला आणखी लोकप्रियता मिळते.
इतर यशस्वी यूट्यूबर्सचे योगदान
टेक्निकल गुरुजी, ज्यांचे खरे नाव गौरव चौधरी आहे, ते त्यांच्या टेक रिव्ह्यूजसाठी प्रसिद्ध आहेत आणि 365 कोटी नेटवर्थसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. समय रैना गेमिंग आणि ह्यूमर कंटेंटसाठी ओळखले जातात. कॅरी मिनाटी रोस्ट आणि सॅटायरमधून प्रेक्षकांची मनं जिंकतो. बीबी की वाइन्स आणि अमित भडाना यांनी विनोदी शॉर्ट्स आणि स्किट्सद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. भारतात यूट्यूब हे केवळ मनोरंजनाचे नाही तर करोडोंची कमाई करणारे व्यासपीठ झाले आहे. तन्मय भट्ट याने या डिजिटल दुनियेत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करून इतर यूट्यूबर्ससाठी प्रेरणा ठरली आहे.











