हॉरर आणि कॉमेडीचा धमाल मेळ साधणाऱ्या मॅडॉक फिल्म्सच्या युनिव्हर्समध्ये आणखी एक थरारक वळण येणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री’पासून सुरू झालेली ही मालिका आता अधिक मोठी आणि चित्तथरारक झाली आहे. ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘भेड़िया’ आणि नुकतीच आलेली ‘मुंज्या’ या चित्रपटांनंतर आता ‘थामा’ नावाचा (THAMA Movie) नवा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यामध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एकामागोमाग तीन पोस्ट्स शेअर करत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
पहिल्या पोस्टमध्ये *”ओ स्त्री परसों आ रही है”* असं लिहिलं असून ‘कल’ हा शब्द काटलेला आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये *”एक थमाकेदार घोषणा के साथ! सूर्यास्त के समय” असं नमूद आहे.
तिसऱ्या पोस्टमध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना दिसत असून त्यात ‘थामा’चं पोस्टर शेअर केलं गेलं आहे.

सर्व पोस्ट्ससोबत एकच कॅप्शन वापरण्यात आलं आहे – THAMA Movie
“स्त्री आ रही है और अपने साथ एक बड़ा थमाका ला रही है। हमने बांद्रा फोर्ट के एम्फीथिएटर में लंच के लिए ज्वाइन करें। इस दीवाली ये यूनिवर्स हमारे लिए वर्ल्डवाइड एक खूनी लव स्टोरी लेकर आ रहा है.”
चाहत्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता
या पोस्ट्स पाहून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. ‘स्त्री ३’ ची घोषणा होणार की ‘थामा’चा ट्रेलर लाँच होणार, यावरून चाहते गोंधळले आहेत. THAMA Movie
एक युजर म्हणतो, “अरे भाई परसों क्या होने वाला है कोई तो बता दो”
दुसरा म्हणतो, “भेड़िया आणि व्हॅम्पायरची लढाई पाहायला वाट बघवत नाहीये.”
तिसरा उत्साही युजर म्हणतो, “असं वाटतंय थामा चा ट्रेलर येणार आहे, मी फारच एक्सायटेड आहे!”
‘थामा’ मध्ये जबरदस्त स्टारकास्ट
‘थामा’ चित्रपटात आयुष्मान आणि रश्मिका यांच्यासह परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर हा हॉरर कॉमेडी धमाका थिएटर्समध्ये धडकणार आहे.
परसों काय होणार? – प्रतीक्षा आता फक्त दोन दिवसांची
‘थामा’चा ट्रेलर लाँच होणार की ‘स्त्री ३’ बाबत एखादी मोठी घोषणा होणार? याची उत्तरं दोन दिवसांत मिळणार आहेत. पण एक गोष्ट निश्चित या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा आगामी थरार प्रेक्षकांना हसवत हसवत घाबरवणार आहे!











