विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स या चित्रपटाची सध्या संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरू आहे. १९४६ च्या कोलकाता हत्याकांड आणि नोआखाली दंगलींवर आधारित असलेला हा चित्रपट पाच सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (The Bengal Files Box Office Collection) या चित्रपटाने म्हणावी अशी कमाई केली नाही, परंतु काल दुसऱ्या दिवशी दुप्पट कमाई करत चित्रपटाने पुन्हा एकदा लक्ष्य वेधलं आहे.
कोलकाता येथे झालेल्या लाँच कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळामुळे चित्रपट अधिकच चर्चेत आला. परंतु, या चर्चेचा चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद पहायला मिळत आहे. मात्र असे असूनही, दुसऱ्या दिवशी द बंगाल फाईलने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये थोडीशी सुधारणा केली आली.

दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई – (The Bengal Files Box Office Collection)
द बंगाल फाइल्सने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फक्त १.७५ कोटी रुपये कमावले. परंतु, दुसऱ्या दिवशी हा आकडा २.०४ कोटी रुपयांवर गेला. या चित्रपटाने एकूण दोन दिवसाचे कलेक्शन सांगायचं झाल्यास दोन दिवसात द बंगाल फाईलने तब्बल ३.७९ कोटी रुपये कमावले आहेत. खरं तर या चित्रपटाबद्दल जे वाद विवाद सुरू आहेत ते पाहता हा चित्रपट आणखी चर्चेत राहील असं बोलत होतो मात्र घडलं याच्या अगदी उलटच जितका खर्च या चित्रपटाला झाला त्याच्यापेक्षा खूपच कमी प्रमाणात बॉक्स ऑफिस वरची कमाई दिसत आहे.
बजेटच्या तुलनेत कमाई कमी –
असे म्हटले जात आहे की द बंगाल फाइल्सचा निर्मिती खर्च ३५ कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत, पहिल्या दिवसाची कमाई (The Bengal Files Box Office Collection) चित्रपटाच्या खर्चापेक्षा खूपच कमी मानली जाते. असं म्हटलं जातं की जर कोणताही चित्रपट पहिल्या दिवशी त्याच्या बजेटच्या १०% कमाई करतो तर तो सरासरी मानला जातो. तर २०% पर्यंत कमाई केल्यास चित्रपटाला चांगली सुरुवात झाली असे मानले जाते. या तुलनेत द बंगाल फाईलची बॉक्स ऑफिस वरची कमाई खूपच कमी आहे.
इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी
द बंगाल फाइल्ससह, बागी ४ आणि उफ ये सियापा सारखे चित्रपट देखील ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाले. यामधील ‘बागी ४’ ने आतापर्यंत २१ कोटी रुपये कमावले असले तरी, ‘द बंगाल फाइल्स’ त्यापेक्षा खूपच मागे आहे. दुसरीकडे, उफ ये सियापा ची कमाई यापेक्षाही कमी होती, परंतु त्याच्या कलेक्शनशी संबंधित कोणताही ठोस डेटा उपलब्ध नाही.
द बंगाल फाईल या चित्रपटात अभिनेत्री पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, सिमरत कौर, सास्वत चॅटर्जी, दर्शन कुमार आणि नमाशी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा भारताच्या फाळणीपूर्वीच्या राजकीय आणि सांप्रदायिक घटनांवर आधारित आहे. ज्यामध्ये १९४६ च्या घटनांचे तपशीलवार चित्रण करण्यात आले आहे. ‘द बंगाल फाइल्स’ला एकीकडे टीका आणि वादांना तोंड द्यावे लागले, तर दुसरीकडे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा विषय राहिला आहे. येत्या काळात त्याची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.











