Tiger Shroff In Hollywood : टायगर श्रॉफची हॉलीवूडमध्ये भव्य एंट्री; या चित्रपटात झळकणार

माध्यमांतील अहवालांनुसार, टायगर लवकरच हॉलीवूडचे दिग्गज अभिनेता सिल्वेस्टर स्टेलोन आणि थायलंडच्या सुप्रसिद्ध मार्शल आर्टस्टार टोनी जा यांच्यासोबत एका जबरदस्त आंतरराष्ट्रीय अ‍ॅक्शन चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आता थेट हॉलीवूडमध्ये (Tiger Shroff In Hollywood) आपली छाप सोडण्याच्या तयारीत आहे. माध्यमांतील अहवालांनुसार, टायगर लवकरच हॉलीवूडचे दिग्गज अभिनेता सिल्वेस्टर स्टेलोन आणि थायलंडच्या सुप्रसिद्ध मार्शल आर्टस्टार टोनी जा यांच्यासोबत एका जबरदस्त आंतरराष्ट्रीय अ‍ॅक्शन चित्रपटात झळकणार आहे.

अमेझॉन एमजीएमचा भव्य प्रकल्प

सूत्रांच्या माहितीनुसार, या भव्य अ‍ॅक्शन चित्रपटाची निर्मिती अमेझॉन एमजीएम स्टुडिओ करत आहे. हा एक ग्लोबल प्रोजेक्ट असून तो बहुभाषिक स्वरूपात तयार करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एका भारतीय दिग्दर्शकाच्या हातात असण्याची शक्यता आहे, परंतु त्याचे नाव अद्याप गोपनीय ठेवण्यात आले आहे.हा प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वाकांक्षी असून सिल्वेस्टर स्टेलोन, टोनी जा आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र आणण्याचा हेतू आहे. यामध्ये हॉलीवूडच्या अ‍ॅक्शनचा थरार आणि आशियाई सिनेमातील मार्शल आर्ट्सची तीव्रता एकत्र पाहायला मिळेल.

टायगर श्रॉफचं स्वप्न साकार Tiger Shroff In Hollywood

टायगरने अनेक वेळा मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्याचं हॉलीवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न आहे आणि सिल्वेस्टर स्टेलोन हे त्याचे आदर्श आहेत. आता त्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. या चित्रपटात स्टेलोनसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे टायगर प्रचंड उत्साहित आहे.

सिल्वेस्टर स्टेलोनचा बॉलिवूडसोबत पूर्ण व्यावसायिक अनुभव

स्टेलोन यापूर्वी २००९ साली ‘कम्बख्त इश्क’ या बॉलिवूड चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. मात्र, हा आगामी चित्रपट त्यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला पूर्ण सहभाग असलेला प्रकल्प असू शकतो. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठीही ही एक ऐतिहासिक घडी ठरू शकते.

टायगर श्रॉफचा वर्कफ्रंट

टायगर श्रॉफ नुकतेच ‘बागी 4’ या अ‍ॅक्शनपटात झळकले होते, ज्याचे दिग्दर्शन ए. हर्ष यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, सोनम बाजवा, हरनाज़ संधू आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली असली, तरी टायगरची अ‍ॅक्शन परफॉर्मन्स नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. २०१७ मध्ये टायगरने स्टेलोनच्या ‘रॅम्बो’ या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार असल्याचं जाहीर केलं होतं, परंतु तो प्रोजेक्ट काही कारणास्तव थांबला होता. आता मात्र टायगरला थेट स्टेलोनसोबत स्क्रीन शेअर करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News