बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan)सध्याच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये गणला जातो. काय ती बॉडी…. काय तो स्मार्ट लूक अन अॅक्टींग ची खास स्टाईल…. वरून धवन च्या अभिनयाने अनेकजण घायाळ झाले आहेत.. आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत वरुण धवनने अनेक हिट चित्रपट दिले आहेत… शक्यतो असं क्वचित झाले की, वरुण धवनचा एखादा पिक्चर फ्लॉप गेला आहे … अन्यथा वरुण धवन चा चित्रपट म्हणजे बॉस ऑफिसची बक्कळ कमाई असे जणू समीकरणाचे पाहायला मिळते… वरुण धवनचे फॅन फॉलोअर सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेत. परंतु तुम्हाला हे माहिती आहे की वरुण धवनला बॉलिवूड अभिनेता व्हायचंच नव्हतं.. त्याच्या डोक्यात लहानपणापासूनच वेगळच स्वप्न होतं…
वरुणला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे होते?
कधी कधी आपल्याला एका वेगळ्या क्षेत्रात काम करायचं असतं आणि आपल्या नशिबात मात्र वेगळे क्षेत्र येतं… वरुण धवन च्या बाबतीत सुद्धा असच काहीसे झालं…. वरुण धवन हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. डेव्हिड धवन यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. वरुणच्या घरी सुरुवातीपासूनच चित्रपटमय वातावरण असल्याने आणि स्वतःची वडीलच दिग्दर्शक असल्याने तो चित्रपटसृष्टीकडे वळला गेला. परंतु लहानपणी वरुण WWE रेस्लर बनण्याचे स्वप्न पाहत होता.

वरुण लहानपणापासून WWE चा चाहता –
वरुण धवन लहानपणापासूनच WWE चा चाहता आहे आणि त्याला अजूनही ते खूप आवडते. लहानपणापासूनच त्याने WWE रेसलर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, काळाच्या ओघात तो या स्वप्नापासून दूर गेला आणि नंतर त्याने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. खरंतर बॉलीवूड मधील त्याचे पहिले पाऊल सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडले. वरुण धवनने काजोल आणि शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठी करण जोहरचा सहाय्यक म्हणून काम केले होते.
करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण
वरुण धवननेनंतर २०१२ मध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत वरुणने ‘मैं तेरा हिरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘जुडवा २’, ‘बदलापूर’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘एबीसीडी २’ असे चित्रपट दिले आहेत.











