दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि रश्मिका मंदानाशी (Vijay Devarakonda Accident) नुकताच साखरपुडा केलेल्या विजय देवरकोंडाच्या गाडीचा अपघात झाला आहे. गडवाल जिल्ह्यातील उंडावल्ली येथे आज दुपारी हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने विजयला कोणतेही गंभीर दुखापत झाली नसली तरी त्याच्या गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय देवरकोंडा हा आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथून हैदराबादला जात होता. याच वेळी दुसऱ्या वाहनाने विजयच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. आणि हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर भयभीत झालेला विजय त्याच्या कार मधून उतरला आणि मित्राच्या कारमध्ये बसला. विजयच्या सुदैवाने त्याला या अपघातात (Vijay Devarakonda Accident) कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर विजयच्या ड्रायव्हर ने पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून दुसऱ्या वाहनाच्या फरार ड्रायव्हरचा शोध पोलिस घेत आहेतं

विजयच्या अपघातग्रस्त कारचे फोटो व्हायरल Vijay Devarakonda Accident
विजय देवरकोंडा याच्या खराब झालेल्या कारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये कारवर अपघाताच्या खुणा दिसत आहेत. अपघातात कारच्या डाव्या बाजूला नुकसान झाले आहे, परंतु इतर कोणत्याही दुखापती झाल्याचे वृत्त नाही. महत्त्वाची बाब म्हणजे विजय आणि त्याचा चालक दोघेही सुरक्षित आहेत.
रश्मिका मंधनाशी नुकताच साखरपुडा झाला –
नुकतंच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकून घेतला आहे. एम९या प्रसिद्ध ऑनलाइन पोर्टलच्या माहितीनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अत्यंत खासगी पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. हा सोहळा कोणत्याही गाजावाजाशिवाय पार पडला. दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणी या वेळी उपस्थित होते. या समारंभात दोघांनी एकमेकांना साखरपुडा अंगठ्या घालून आपलं प्रेम आणि एकत्र आयुष्य जगण्याचं वचन दिलं.