बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि काजोलच्या घरात राहायचंय? एका रात्रीचे द्यावे लागतील इतके रुपये, पाहा घराचा Video

याव्यतिरिक्त येथे एका सुंदर प्रायव्हेट स्विमिंट पूल, गजीबो, जकूजी, ओपन लिव्हिंग आणि डायनिंग एरिया, वॉक इन शॉवर्सस एन्टरटेनमेंट सिस्टिम, योगा डेक आहेत.

Step inside Ajay Devgn and Kajol’s Goa villa: तुम्हीही गोवा जाण्याचा प्लान करताय आणि तिथं थांबण्यासाठी एखाद्या लग्झरी आणि अत्यंत सुंदर ठिकाणाच्या शोधात आहात? जर हो असेल तर अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन यांच्या व्हिल्यात राहू शकता. सर्वांसाठी हा व्हिला उपलब्ध आहे. ज्यांना धकाधकीच्या जीवनातून, रोजच्या गर्दीतून चांगली सुट्टी एन्जॉय करायची असेल तर तुम्हीही हा व्हिला बुक करू शकता.

आतून हा व्हिला कसा दिसतो आणि यात राहण्यासाठी किती भाडं द्यावं लागतं?

अजय देवगन आणि काजोल यांचा हा विला पोर्तुगीज ऑर्किटेक्टर आणि मॉर्डन लक्जरीचा अत्यंत अत्यंत सुंदर असं मिश्रण आहे. यात ५ मोठे बेडरूम आहेत आणि प्रत्येक खोलीत संलग्न बाथरूम आहे. येथे एकूण १२ पाहुणे आरामात राहू शकतात. व्हिलाचा मास्टर बेडरूम एका खाजगी बागेकडे उघडतो, जो त्याला आणखी खास बनवतो.

याव्यतिरिक्त येथे एका सुंदर प्रायव्हेट स्विमिंट पूल, गजीबो, जकूजी, ओपन लिव्हिंग आणि डायनिंग एरिया, वॉक इन शॉवर्सस एन्टरटेनमेंट सिस्टिम, योगा डेक, आऊटडोअर डायनिंग आणि बारबेक्यू , मोठा लॉन्ज एरिया आणि इव्हेंट्ससाठी स्पेशल स्पेसदेखील मिळेल. म्हणजेच Villa Eterna मध्ये सर्व प्रकारची लग्जरी सुविधा आहे. सोबतच व्हिला नॉर्थ गोवामधील समुद्रकिनारे आणि स्थानिक मार्केटपासून खूप जवळ आहे.

एका रात्रीचं भाडं किती?

या आलिशान व्हिलात राहण्यासाठी तुम्हाला एका रात्रीचे ७९,६५० रुपये मोजावे लागतील. यामध्ये टॅक्स आणि अन्य चार्जेस यांचाही समावेश आहे. हा व्हिला amastaysandtrails.com या संकेतस्थळावर बुक करू शकता.


About Author

Smita Gangurde

Other Latest News