२०१० साली ‘दबंग’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानआणि त्यांच्या कुटुंबावर थेट गंभीर आरोप करत बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनव कश्यप (Who Is Abhinav Kashyap) यांनी सलमान खानला “गुंडा”, “बदतमीज” आणि “गंदा इंसान” असे संबोधले. इतकंच नव्हे, तर त्यांनी सलमानच्या अभिनय क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “त्याला अभिनयात रसच नाही. तो सेटवर येतो ते एक प्रकारचं उपकार समजून,”असं तिखट वक्तव्य करत अभिनव यांनी सलमानच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कामाच्या शैलीवर जोरदार टीका केली. अशावेळी थेट बॉलीवूडच्या भाईजानवर आरोप करणारे अभिनव कश्यप आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल …. चला तर मग जाणून घेऊया..
कोण आहेत अभिनव कश्यप? Who Is Abhinav Kashyap
अभिनव हे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे लहान बंधू आहेत. जिथे अनुरागने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘ब्लॅक फ्रायडे’सारख्या चित्रपटांद्वारे सिनेमॅटिक रियलिझमला चालना दिली, तिथे अभिनवने ‘दबंग’सारख्या मसाला चित्रपटांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली (Who Is Abhinav Kashyap). सिनेसृष्टीत प्रवेश करण्याआधी अभिनवने ‘जंग’, ‘युवा’ यांसारख्या चित्रपटांसाठी लेखक म्हणून काम केले. तसेच ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’ आणि ’13B’ या चित्रपटांचे डायलॉग्सही त्यांनी लिहिले होते. टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी ‘श्श्श… कोई है’, ‘दिल क्या चाहता है’ आणि ‘सिद्धांत’ यासारख्या कार्यक्रमांचं दिग्दर्शन केलं.

दबंग’चा यशस्वी प्रवास आणि नंतरचा संघर्ष –
‘दबंग’ चित्रपटामुळे अभिनव कश्यप यांचं नाव घराघरात पोहोचलं. चुलबुल पांडे या पात्राला त्यांनी दिलेलं रुप सिनेरसिकांना विशेष भावलं. पण, ‘दबंग २’ न करण्याचा निर्णय आणि त्यानंतर सलमान व त्यांच्या कुटुंबाशी आलेले वाद यामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. Who Is Abhinav Kashyap
बॉलिवूडमधील गटबाजीवर गंभीर आरोप
अभिनव कश्यप यांनी अनेकदा बॉलिवूडमधील “माफिया संस्कृती”, गटबाजी आणि कलाकारांना संपवण्याच्या खेळीवर उघडपणे भाष्य केले आहे. “माझं करिअर संपवण्यासाठी दबाव आणला गेला. मलाही आत्महत्या करावी लागली असती, पण मी लढलो,”असं त्यांनी याआधीही सोशल मीडियावर म्हटलं. दरम्यान सध्या सलमान खान किंवा त्यांच्या कुटुंबाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, अभिनवच्या या थेट आरोपांमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील ‘साइलेंट वॉर्स’ समोर येत आहेत.











