मुंबईत सकाळापासून मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचले, लोकल आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम

Astha Sutar

Mumbai Rain – मुंबईत आज (सोमवारी) पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच जे पाणी तुंबलेले आहे त्याचा निचरा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळं अशाच पाऊस पडला तर रेल्वे लोकलही ठप्प होण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईत पाणी साचले

दरम्यान, आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळं मुंबईकरांना चाकरमान्यांना कार्यालय गाठण्याची घाई असते. पण त्यातच पाऊस पडत असल्यामुळं साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांना त्रास होत आहे. दरम्यान मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच जे पाणी तुंबलेले आहे, यामध्ये दादर, सायन, वरळी, हिंदमाता, आदी भागात पाणी तुंबले आहे. तसेच मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लोकल आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम

दुसरीकडे मुंबईत मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळं मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता. तर मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिरा आहे. दुसरीकडे वरळीत आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळं या पाण्यातूनच मुंबईकर वाट काढताहेत.

ताज्या बातम्या