मुंबई आणि उपनगरात २४ तासासाठी मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा

Astha Sutar

Mumbai Rain – मुंबई आणि उपनगरात आज (मंगळवारी) पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचले. तसेच जे पाणी तुंबलेले आहे त्याचा निचरा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शनिवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून, पुढील २४ तासासाठी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. तसेच मुंबईत विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत सोमवारी 119 मिमी पाऊस

मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर पकडला. सोमवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला तुंबून टाकले. उपनगरापेक्षा शहरात सर्वाधिक 119 मिमी पाऊस झाला. त्या तुलनेत उपनगरात कमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरात 77 मिमी तर पूर्व उपनगरा 75 मिमी पावसाची नोंद झाली. तर सोमवारी पावसाचा परिणाम पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवर दिसून आला. लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावल्या होत्या. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास अर्ध्या तासाने लांबला. तसेच रस्ते वाहतूकीवरही परिणाम दिसून आला. पुढील २४ तासासाठी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. तसेच मुंबईत विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट

दरम्यान, आज सुद्धा मुंबईत उपनगरात पावसाची रिपरिप सुरु आहे, सोमवारी मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावासामुळं दादर, सायन, वरळी, हिंदमाता, आदी भागात पाणी तुंबले होते. तर आज कोकणसह मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत देखील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबई, ठाण्यासाठी आज देखील ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला  आहे. तसेच मुंबईत विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या