लहान मुलांचं कान टोचण्याबाबत पालक नेहमी संभ्रमात असतात. कोणत्या वयात कान टोचणं योग्य असतं असं विचारलं तर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. लहान वयात कान टोचल्यास बाळाला त्रास होईल अशीही भीती असते. मात्र कान टोचण्यासारखे प्रश्न डॉक्टरांना कसे विचारायचे, असं तुम्हाला वाटत असलं तरीही तुम्ही असे प्रश्नही डॉक्टरांना विचारू शकता.
लहान मुलांचे कोन टोचण्याचं योग्य वय कोणतं? | Right Age For Ear Piercing For Children
डॉक्टरांनी सांगितलं की, मुलांचं कान टोचण्यासाठी निश्चित वय नसतं. मात्र सर्वसाधारणपणे टोचलेला कान मूल सांभाळू शकतं, असा विश्वास वाटू लागल्यावर पालक त्या वयात मुलांचे कान टोचतात. कारण कान टोचल्यानंतर तो नियमित स्वच्छ करायला हवं. अन्यथा कानावरील जखम चिघळण्याती भीती असते.
लहान वयात कान टोचायचं असेल तर बाळ किमान सहा महिन्याचं झाल्यानंतर टोचावे. या काळात बाळाचं रोगप्रतिकारशक्ती सुधारत असते. मात्र डॉक्टरांनुसार मुलांचं कान टोचण्याचं योग्य वय 6 ते 7 वर्षे आहे. या वयात बाळ आपल्या कानाची नीट काळजी घेऊ शकतो.
कान टोचतानाच्या वेदना कशा कमी कराल?
कान टोचल्यानंतर कानात वेदना होत असतील तर नंबिंग क्रीम किंवा बर्फाचा वापर करता येतो, यातून वेदना कमी होतील. कान टोचण्यापूर्वी जर मुलाच्या कानावर बर्फ चोळला तर वेदना कमी होतात.
कानातलं कसं निवडाल
मुलाचे कान टोचल्यानंतर रक्तस्त्राव, सूज आणि संसर्ग इत्यादींची भीती असते. अशा परिस्थितीत, डॉक्टर कानांसाठी सोनेरी किंवा स्टेनलेस स्टीलचे कानातले निवडण्याचा सल्ला देतात. यामुळे अॅलर्जीचा धोका कमी होतो.
कान टोचल्यानंतर कानातले किती काळ घालावेत?
डॉक्टर म्हणतात की, कान टोचल्यानंतर ते ब्लॉक होऊ नयेत म्हणून कानात एखादा खडा किंवा रिंग किमान 6 ते 7 आठवडे ठेवणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला आहे. कानावरील होल ब्लॉक होऊ नये म्हणून कानातले दररोज गोल गोल फिरवावीत.





