हार्ड ड्रिंक न पिणारे अधिकतर बिअरकडे वळतात. अनेकांना बिअर पिणं आवडत. लग्नापासून पार्टीपर्यंत अनेकदा बिअर आवर्जुन ठेवली जाते. मात्र आनंदाने बिअर पिणाऱ्यांना ही धोक्याची घंटा आहे.
बिअर पिण्याचे ५ नुकसान

बियर प्यायल्याने शरीरातील फॅट वाढू शकतो. दररोज बिअर पित असाल तर वेस्टलाइन हळूहळू वाढू लागते आणि फॅट जमा होते.
महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होतं. याचा मासिक पाळी, मूड आणि अॅस्ट्रोजनवर परिणाम होतो.
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन कमी आणि एस्ट्रोजन वाढतं. यामुळे ऊर्जा, सादरीकरण आणि आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो.
बिअरमुळे हाडांना धोका
बिअरमुळे हाडं ढिसूळ होतात आणि वयाच्या ३५ शी नंतर याचा धोका अधिक वाढतो.
बिअरचा लिव्हरवर परिणाम होतो. बराच काळ नियमित बिअर पित असाल तर फॅटी लिव्हर, सिरॉयसिस आणि अल्कोहोलिक हेपेटायटिसचा धोका वाढतो.
अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन आणि गॅस्ट्रिक त्रास वाढतो. यामुळे अॅसिडिटी, उलटीचा त्रास होतो
बिअर पिण्यामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. दीर्घकाळापर्यंत जास्त प्रमाणात बिअर प्यायल्याने स्मरणशक्ती कमी होणे, संज्ञानात्मक विकार आणि व्हिटॅमिन बी१ ची कमतरता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.











