सकाळी सकाळी ताज्या हवेत धावणे एक चांगली सवय मानली जाते. हे केवळ शरीरालाच नाही तर मानसिकदृष्ट्याही चांगलं मानलं जाते. मात्र एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो, तो म्हणजे रिकाम्या पोटी धावणं योग्य आहे का? काहींचं म्हणणं आहे की, यामुळे फॅट लवकर बर्न होतं. तर काहींनुसार यामुळे थकवा, अशक्तपणा वाटू शकतो. या लेखात आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.
रिकाम्या पोटी धावण्याचे फायदे (Benefits of Running on an Empty Stomach)
फॅट लवकर बर्न होतं

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी धावता, तेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते. अशात शरीर आधी जमा असलेल्या फॅटचं रुपांतर ऊर्जेत करतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२ हृदयाचं आरोग्य सुधारतं
दररोज धावल्याने हृदय अॅक्टिव्ह राहतं आणि रक्तप्रवाह चांगला राहतो. यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.
३ पचन यंत्रणा मजबूत होते
रिकाम्या पोटी हलक्या स्वरुपात रनिंग केल्याने पचनक्रिया अॅक्टिव्ह होते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
४ मानसिक आरोग्य सुधारतं
रनिंग केल्याने आणखी एक फायदा होतो, तो म्हणजे सकाळी रनिंग केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि मूड चांगला राहतो. परिणामी तणाव आणि चिंता कमी होते.
५ झोप चांगली येते
सकाळी रनिंग केल्याने रात्री गाढ आणि चांगली झोप येते. यामुळे शरीर आणि मेंदू दोन्हीला आराम मिळतो. जर कुणाला झोपेसंदर्भात त्रास होत असेल तर त्यांनी रनिंग करावं.
रिकाम्या पोटी रनिंग करण्याचे नुकसान
१ एनर्जीची कमतरता
रिकाम्या पोटी रनिंग केल्याने शरीरात कार्बोहायड्रेची कमतरता होऊ शकते. ज्यामुळे लवकर थकवा येऊ शकतो आणि रनिंगचा स्टॅमिना कमी होऊ शकतो.
२ रिकाम्या पोटी रनिंग केल्याने एनर्जी कमी असते, अशावेळी बॅलेन्स बिघडू शकतो. ज्यामुळे खाली कोसळण्याचा किंवा मसल्स खेचल्या जाणाऱ्या धोका असतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही सुरुवात करीत असाल तर हल्का नाश्ता किंवा केळ किंवा बदाम खाऊन रनिंग करा.
रिकाम्या पोटी फार लांब रनिंग करू नये
शरीर हायड्रटेड ठेवण्यासाठी पाणी प्या
चक्कर किंवा अशक्तपणा वाटत असेल तर तातडीने थांबा.











