Stale Roti : जर तुम्हाला ताजी आणि गरमागरम पोळी खायला आवडते आणि शिळ्या पोळ्या पाहून तुम्ही तोंड फिरवत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. शिळ्या पोळ्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात असं तुम्हाला कोणी सांगितलं तर विचित्र वाटेल. मात्र हे सत्य आहे. शिळ्या पोळ्या खाल्ल्याने तुमची पचनशक्ती चांगली होते. रक्तातील साखर नियंत्रणातच राहते आणि इतकच नाही तर वजन कमी करण्यासाठीही तुम्हाला फायदा होतो. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैनी यांनी सायन्स आणि आयुर्वेदिक दोन्ही दृष्टिकोनातून शिळ्या पोळ्या खाण्याचे काही फायदे सांगितलं आहेत. जे याआधी तुम्ही कधीच ऐकले नसतील. यानंतर तुम्ही कधीच शिळ्या पोळ्या खायला नाही म्हणणार नाही.
शिळ्या पोळ्या खराब असतात हे अत्यंत चुकीचं आहे. याचा अर्थ असा की पोळीमध्ये काही नैसर्गिक बदल झाले आहेत ज्यामुळे ती ताज्या भाकरीपेक्षा वेगळी आहे. म्हणून लक्षात ठेवा की जर तुम्ही ती योग्यरित्या पोळी साठवली आणि योग्य वेळी खाल्ली तरच तुम्हाला शिळ्या पोळीचा फायदा मिळेल.

जास्त खाणं होत नाही…l overeating
ताजी पोळी जास्त खाल्ली जाते. अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही की आपण किती पोळ्या खाल्ल्या. यामुळे पचन यंत्रणेवर लोड येतो. तर दुसरीकडे थंड किंवा शिळी पोळी नेमकी खातो. यामुळे लवकर पोट भरल्याची भावना येते. आणि अतिरिक्त खाणं होत नाही.
पचन
शिळी पोळी खाल्ल्याने स्टार्च रेट्रोग्रेशन नावाची प्रक्रिया सुरू होते. आणि यामुळे ती पचण्यास सोपी होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा पोळई थंड आणि शिळी होते, तेव्हा त्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स साध्या आणि हलक्या स्वरूपात मोडतात आणि ते पोटात सहज पचतात. म्हणूनच पोट फुगणे किंवा इतर काही त्रास असलेल्या लोकांसाठी शिळी पोळी किंवा भाकरी खूप फायदेशीर आहे. कदाचित म्हणूनच जुन्या काळात लोक नाश्त्यात दूध किंवा तुपासोबत शिळी पोळी खाणे पसंत करायचे.
मधुमेह
शिळ्या पोळीत विशेष प्रकारचा स्टार्च तयार होतो. ज्याला रेडिस्टेंट स्टार्च म्हणतात. हे प्रतिरोधक स्टार्च ताज्या पोळीपेक्षा हळूहळू पचतं. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही शिळी पोळी खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढत नाही. साखर शरीरात, रक्तात हळूहळू विरघळते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर आणि नियंत्रणात राहते.
गट हेल्थ आणि रोगप्रतिकशक्ती
शिळ्या पोळीत नैसर्गिकरित्या काही प्रीबायोटिक्स डेव्हलप होतात. हे गुड बॅक्टेरिया पोटाला हेल्दी ठेवतात. आणि तुमची इम्युनिटी मजबूत करतात. शिळ्या पोळीतील प्रीबायोटिक्स आपल्याला चांगले बॅक्टेरिया वाढविण्यास मदत करतात. आणि शरीरात चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन जितके चांगले असेल तितके आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आपले पचन चांगले होते.
शिळी पोळी कशी खाल?
शिळी पोळी आरोग्यासाठी चांगली असते. मात्र ती योग्य पद्धतीने स्टोअर करायला हवी. गरम किंवा ओलावा असेल अशी ठिकाणी पोळी ठेवू नये. याला जर फंगस लागले तर याचं तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. पोळी नेहमी फ्रिज किंवा ड्राय कंटेनरमध्ये ठेवायला हवी. शिळी पोळी १२ ते १५ तासांच्या आत खायला हवी. हवं असेल तर शिळी पोळी थोडी गरम करू शकता. मात्र वारंवार गरम करू नये. अन्यथा यात रेजिस्टेंट स्टार्च निर्माण होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











