Teeth Shape Personality : असे दात असतील तर नशीब कायम सोबत राहील, दातांवरुन भविष्य जाणून घ्या

कोणत्याही व्यक्तीचं दात तिचे गूण, दु:ख आणि भविष्याचं गूढ उलगडतं. या लेखात दातांवरुन आपण भविष्य पाहणार आहोत.

Teeth Shape Personality : आपलं हास्य आणि सौंदर्य वाढविण्याबरोबरच दातांमुळे भविष्याचे संकेत मिळतात. ज्या प्रकारे हस्तरेखा शास्त्रात हातातील रेखा आणि उचंवट्यावरुन व्यक्तीच्या भविष्याबाबत अंदाज आखले जातात, त्यानुसार, सामुद्रिक शास्त्र आणि हस्तरेखा विज्ञानात शरीराच्या विविध अवयवांच्या रचनेनुसारस व्यक्तीचं जीवन, स्वभाव आणि भविष्याबाबत अंदाज लावले जाऊ शकतात. शास्त्रानुसार, दातांच्या रचनेबाबत बरंच काही सांगितलं जात आहे. कोणत्याही व्यक्तीचं दात तिचे गूण, दु:ख आणि भविष्याचं गूढ उलगडतं. या लेखात दातांवरुन आपण भविष्य पाहणार आहोत.

असे दात असतील तर भाग्य उजळतं

ज्य़ांचे बत्तीस दात असतात त्यांचं जीवन सुखदायी असतं. अशा दातांना हस्तरेखा विज्ञानात शुभ मानण्यात आलं आहे. या लोकांना नशीबाची साथ मिळते. ते प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. या व्यक्तींना सत्याच्या मार्गाने जाणं आवडतं, आणि खोटं बोलणाऱ्यांपासून नेहमी दूर राहतात.

यांना पैशांची कमतरता भासते

ज्या लोकांचे तीस दात असतात, त्यांना पैसे कमविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. करिअरमध्ये खूप मेहनत केल्यानंतर त्यांना काही प्रमाणात यश मिळतं. अशा लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.

असे दात असणारे धनवान असतात

जर एखाद्या व्यक्तीचे दात सरळ रेषेत समान अंतरावर असतील आणि गुळगुळीत असतील तर ते चांगलं मानलं जातं. सामुद्रिक शास्त्रानुसार, असे दात असलेले लोक खूप श्रीमंत असतात आणि त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठी प्रगती देखील करतात आणि आनंदी जीवन जगतात. सरळ रेषेत समान अंतरावर असलेले दात दर्शवितात की असे लोक दिसायला खूप आकर्षक असतात आणि त्यांना कोणताही निर्णय हुशारीने घेणे आवडते.

असे दात असेल तर आर्थिक अडचण

ज्यांचे दात आतल्या बाजूला असतील तर अशांना जीवनात अनेक समस्या आणि त्रासाचा सामना करावा लागतो. यांची आर्थिक स्थिती बेताची असते. आनंदी जगण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागतो. सामुद्रिक शास्त्रात ओबडधोबड, आणि काळ्या दिसणाऱ्या दातांनाही शुभ मानलं जात नाही.

हे लोक नेहमी मालामाल असतात

जर एखाद्या व्यक्तीचे दात लांब असतील तर ते लकी मानले जातात. अशांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. ज्यांचे दान एकमेकांपासून वेगळे असतात, किंवा अंतर असेल तर ते आपल्या साथीदाराच्या पैशांनी आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि आनंदात जगतात.


About Author

Smita Gangurde

Other Latest News