बहुगुणी उंबरअनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे…

Asavari Khedekar Burumbadkar

उंबर जिथे आहे तिथे श्री. दत्तगुरुंचा वास असतो,असे हिंदू धर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला आध्यात्मिक महत्व आहे. उंबर हे एक गुणकारी फळ असून ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायद्याचे आहे. उंबर फळाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच ते मधुमेह आणि अतिसार यासारख्या आजारांवरही गुणकारी आहे. 

जखमांवर

जखम झाल्यस उंबराच्या काढ्याने धुतल्यास, ती वेगाने बरी होते. जखमांवर उंबराचा चीक लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात. 

अतिसारावर उपाय

उंबराची फळे, फुले आणि पाने अतिसारावर उपयोगी पडतात. अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा घ्यावा.

शरीरातील उष्णता कमी करते

अंगात उष्णता, कडकी असल्यास उंबराची दोन फळे रोज सकाळी खडीसाखरेसोबत खावीत. उंबर हे एक नैसर्गिक शीतलक आहे, जे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल, तर सालिचा काढा, पोटातून देतात. गर्भपात, होउ नये म्हणून, गर्भाचे पोषण निट व्हावे म्हणून, याच्या सालिचा काढा घेतात.

उंबर फळ दूधांत शिजवून खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होते, पोटाचे सर्व विकार बरे होतात. विशेषतः हे थंड गुणधर्माचे असल्यानेच, आम्लपित्त, मळमळ, पोटात दाह, अल्सर, सारखे आजार याच्या सेवनाने बरे होतात.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या