Cholesterol kasa control karal : हाय कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी अजिबात चांगलं मानलं जात नाही. यामुळे हृदय रोग आणि हॉर्ट अट्रॅकचा धोका वाढतो. काही जण औषध घेऊन कोलेस्टेरॉल कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र केवळ औषधांनी पूर्णपणे कोलेस्टेरॉल कमी होच नाही. तुम्ही बऱ्याच महिन्यांपासून कोलेस्टेरॉल कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर आधी तुम्ही जीवनशैलीत बदल करा. जाणून घ्या या तीन टिप्स

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहारात करा बदल
डाएट
कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर सर्वात आधी डाएटमध्ये बदल करा. आहारातील फायबरचं प्रमाण वाढवा, ओट्स, सफरचंद, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा. फळांमध्ये सफरचंद, जांभूळ, आंबट फळं खा. यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं.त्याशिवाय ग्रीन टी, टोफू, सोया याचंही सेवन करू शकता.
व्यायाम करा
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी चांगल्या डाएटसह व्यायाम आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर आणि कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवडयातून पाच वेळ कमीत कमी ३० मिनिट व्यायाम करा. किंवा आठवड्यातून तीन वेळा २० मिनिट एरोबिक अॅक्टिविटी करू शकता.
वजन कमी करण्यावर फोकस करा
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करा. ज्यातून कॅलरी वाढते असे पदार्थ खाणं बंद करा. गोड खाण्याची इच्छा होत असेल तर सरबत किंवा कमी गोड कँडी जेली बीन्स ट्राय करू शकता. याशिवाय आपल्या दैंनदिन अॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा. कामादरम्यान ब्रेक घ्या आणि फिरून या. उभं राहून काम करा. याशिवाय स्मोकिंग करत असाल तर सोडून द्या.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











