धक्कादायक! मिरा रोडमध्ये 23 वर्षीय एअर होस्टेसवर अत्याचार; अत्याचार करणारा निघाला ‘पायलट’

परदेशी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच लैंगिक अत्याचार करण्यात केल्याची घटना मिरा-भाईंदरमध्ये समोर आली आहे.

मुंबईच्या मीरा-रोडमधून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका परदेशी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच लैंगिक अत्याचार करण्यात केल्याची घटना मिरा-भाईंदरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस आणखी तपास करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

घरी बोलावले आणि…अत्याचार

संबंधित आरोपी त्याच कंपनीत पायलट म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.मिरा रोडमध्ये राहणारी 23 वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी हा एकाच विमान कंपनीत कामाला आहेत. ते दोघेही लंडनची फेरी पूर्ण करून 29 जूनला मुंबईत परतले. रात्री उशीर झाल्याने पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली होती. याचा फायदा घेत, आरोपीने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. घरी कोणीही नसल्याने त्याने या प्रसंगाचा फायदा उचलत तिच्यावर अत्याचार केले असे तरूणीचे म्हणणे आहे.

त्या दिवशी पायलटने आग्रह केल्यानंतर ती त्याच्या घरी गेली. जेव्हा दोघेही त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घरी कोणीही नसल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर पायलट तरुणीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीच्या तक्रारीत करण्यात आला आहे., असे आपल्या फिर्यादीत तरूणीने म्हटले आहे.

अत्याचार केले; नंतर धमक्या

त्यानंतर, झालेला प्रकार कोणाला सांगू नको अशा धमक्या आरोपी तरूणीला मागील अनेक दिवस देत होता. अखेर या प्रकाराला कंटाळून पीडितेने नुकतीच नवघर पोलिस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करत, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलीस या प्रकरणात अधिकचा तपास करणार आहेत. तरूणीचे आरोप खरे आहेत का, याची देखील पडताळणी केली जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News