MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

‘लालबागचा राजा’ची एक झलक पाहण्यासाठी गणेश भक्ताची तुडूंब गर्दी, बाप्पाला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

Written by:Astha Sutar
नवसाला पावणारा गणपती अशी 'लालबागचा राजा' या गणपतीची ख्याती आहे. 'लालबागचा राजा' या गणपतीची एक झलक किंवा बाप्पाचे लांबून का होईना पण दर्शन घेण्यासाठी दक्षिण मुंबई परीसरात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.

Ganesh Immersion 2025 : गेल्या 10 दिवसांपासून लाडके गणपती बाप्पा विराजमान होते. पण आज (शनिवारी) मुंबईसह महाराष्ट्रात बाप्पांचे विसर्जन होत आहे. मुंबईत गणपती विसर्जन सोहळा भव्य दिव्य असतो. हा सोहळा पाहण्यासाठी मुंबईसह मुंबई उपनगरातून गणेश भक्तांची रिघ लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, परेल आणि गिरगाव चौपाटीवर पाहयला मिळते. सार्वजनिक गणेश मंडळातील गणपती हे ढोलताशा, डिजे, लेझिम पथकाच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढत चौपाट्यांवर विसर्जन केले जाते.

दरम्यान, नवसाला पावणारा गणपती अशी ‘लालबागचा राजा’ या गणपतीची ख्याती आहे. ‘लालबागचा राजा’ या गणपतीची एक झलक किंवा बाप्पाचे लांबून का होईना पण दर्शन घेण्यासाठी दक्षिण मुंबई परीसरात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.

लालबागमध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी….

दरम्यान, लालबागच्या राजाची एक झलक किंवा दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी लालबागमध्ये पाहयला मिळत आहे. दरम्यान, लालबागच्या राजा आधी लालबागमधील मुंबईचा राजा आणि तेजूकाय गणपती हे विसर्जनासाठी मंडपातून बाहेर काढले गेले. यानंतर लालबागच्या राजा गणपती विसर्जनासाठी बाहेर काढला  गेला. लालबागच्या राजाचे विसर्जन उद्या सकाळी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर जनसागर लोटला आहे।

ढोल तासाच्या गजरात बाप्पाला निरोप

आज लाडके बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत. दहा दिवसानंतर गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळं जड अंतकारणाने गणेश भक्त गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. गणेश भक्तांकडून गणपतीचा जयघोष करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…., अशा घोषणा देण्यात येताहेत. तर दुसरीकडे लालबागच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होणार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.