बाईक टॅक्सीला मंजुरी, पण बेस्टचे काय? राज्य सरकार सार्वजनिक वाहतुकीचे खासगीकरण करत आहे, आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबईकरांची हक्काची आणि मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी अशी ओळख असलेली बेस्ट सेवा राज्य सरकार संपवत आहे. बेस्टच्या डेपोंचा ताबा ठेकेदारांना दिला जात असल्याचा आरोपही आदित्य ठाकेरंनी सरकारवर केला.

Aditya Thackeray – राज्य सरकारने मुंबईत सिमेट काँक्रेटचे रस्ते करण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईच्या रस्त्यांवर आता पुन्हा खड्डे पडले आहेत. १५ जानेवारी २०२३ रोजी रस्त्यांच्या कथित घोटाळ्याची पोलखोल आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था आणि बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीवरून फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज त्यांनी मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

बाईक-टॅक्सीला मंजुरी, बेस्टचे काय?

दरम्यान, राज्य सरकारने एका बाईक टॅक्सी कंपनीला तात्पुरते परवाने दिले आहेत. यावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला. एका बाईक-टॅक्सी कंपनीने प्रो-गोविंदा स्पर्धेला प्रायोजकत्व दिले. आणि लगेचच त्यांना परवाने कसे काय दिले गेले? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तुम्ही रस्त्यावर नेमक्या किती बाईक-टॅक्सी आणणार आहात? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीचे खासगीकरण होत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. भाजप आणि एसंशी गट सार्वजनिक वाहतुकीचे खासगीकरण करत असून, याचा नेमका फायदा कोणाला होणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित करत शिदे, फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

सर्वसामान्यांसाठी खिशाला आर्थिक भुर्दंड?

दुसरीकडे बाईक-टॅक्सीच्या दरांवरही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. दीड किलोमीटर प्रवासासाठी १५ रुपये भाडे आकारण्यात आले आहे. तर मग सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नाही. आमचा विरोध बाईक-टॅक्सीला नाही, पण परिवहन विभाग बेस्ट (BEST) ला मदत करत नाही, असं ठाकरे म्हणाले. ५ किलोमीटरचा प्रवास बेस्ट बसने ५ रुपयांत होत होता, तोच आता बाईक टॅक्सीने १५ रुपयांत होणार, त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड पडणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

नेमके किती थर रचणार?

मुंबईकरांची हक्काची आणि मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी अशी ओळख असलेली बेस्ट सेवा राज्य सरकार संपवत आहे. बेस्टच्या डेपोंचा ताबा ठेकेदारांना दिला जात असल्याचा आरोपही आदित्य ठाकेरंनी सरकारवर केला. दरम्यान, यापूर्वी रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी कंपन्यांवर धाडी टाकल्या गेल्या होत्या, पण आता एका कंपनीला परवाने कसे दिले गेले?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. सरकार बाईक टॅक्सीच्या माध्यमातून नेमके किती थर रचणार आहे? असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.


About Author

Astha Sutar

Other Latest News