Mohit Kamboj : राजकारणातून एक मोठी व धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपाचे तरुण, तडफदार व उदोन्मुख नेते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडके नेते अशी ओळख असलेले मोहित कंबोज यांनी राजकारणातून सन्यास घेतला आहे. त्यांच्या या अचानक निर्णयामुळं अनेकांना धक्का बसला असून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेकाच्या भुवया उंचावल्या असून विविध तर्कवितर्क आणि चर्चाना उधाण आलं आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने माहिती दिली आहे.
अवघ्या 41व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती
दरम्यान, मोहित कंबोज आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पण वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी राजकारणातून त्यांनी सन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे. भाजपचे एकेकाळचे सर्वात श्रीमंत उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून कंबोज यांची ओळख आहे. तसेच इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. मागील काही महिन्यांपासून मोहित कंबोज राजकारणांपासून लांब आहेत. मी माझ्या व्यवसायासाठी अधिक वेळ देऊ इच्छितो असे निवृत्तीचे कारण मोहित कंबोज यांनी सांगितले आहे.
कंबोज यांचा व्हीडिओ व्हायरल
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता काबीज केल्यानंतर, फडणवीसांशी असलेल्या जवळीकतेमुळे कंबोज यांचे राजकीय स्थान वाढले. निकालानंतर लगेचच फडणवीस यांना उचलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता कंबोज यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतल्याचे समजते. मात्र त्यांच्या या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढले जाताहेत.
कोण आहेत मोहित कंबोज?
- मोहित कंबोज मूळचे वाराणसीचे आहेत.
- २००२ मध्ये ते मुंबईत आले आणि व्यवसायाच्या माध्यमातून अल्पावधीतच जम बसवला.
- इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष झाले. इथे काम करताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ते प्रकाश झोतात आले.
- २०१३ मध्ये भाजपने त्यांच्याकडे शहर भाजपचे उपाध्यक्षपद दिले.
- २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. पण यात कंबोज यांचा सुनील प्रभू यांनी पराभव केला.
- पराभवानंतरही त्यांना भाजपच्या युवा शाखेच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष करण्यात आले.
- या निवडणुकीत ते भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. ३५३.५३ कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी घोषित केली होती.





