महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीसह पावसाच्या सरी कोसळणार? हवामान विभागाचा चक्रावणारा अंदाज

दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान राहील. थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमानात घसरण होईल.

महाराष्ट्रातील हवामान सध्या कमालीचे अस्थिर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कडाक्याच्या थंडी असून वातावरणात गारवा निर्माण झाला असताना, 24 नोव्हेंबर रोजी हवामानात बदल अपेक्षित आहे. भारतीय हवामान विभागआणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान राहील. थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमानात घसरण होईल. त्यामुळे एकूणच संमिश्र अशा स्वरूपाचे हवामान सध्या पाहायला मिळत आहे.

राज्यातील कुठे थंडी तर कुठे पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. नोव्हेंबर अखेर पुन्हा हवापालट झाली असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.  पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमानात वाढ झाली. मात्र थंडीचा अनुभव कायम आहे. आज 24 नोव्हेंबर रोजी संमिश्र अशा स्वरूपाचे हवामान राज्यभरात अनुभवायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्याच्या किनारी भागात दिसून येत आहे. यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक आणि कोल्हापूरसारख्या भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे, पण एकूणच थंडी वाढेल. विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

थंडीचा कडाका कमी; नागरिकांना दिलासा

राज्यासह मराठवाड्यात सध्या तापमानात सतत बदल जाणवत आहेत. काही भागात तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे मराठवाड्यात गारठ्याचा अनुभव काही प्रमाणात कमी झालेला नाही. साधारणतः सर्वत्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये दिवसभर हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सकाळ-संध्याकाळ थंडी जाणवेल, तर दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढू शकतो. बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार राहील. सकाळी दाट गारवा आणि रात्री बोचरा वारा जाणवू शकतो. मात्र दुपारच्या सुमारास हवेत किंचित उबदारपणा वाढेल.

याचप्रमाणे विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तापमान दिवसा वाढेल, तर रात्रीच्या वेळी चांगलीच थंडी जाणवणार आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये थंडीत काहीशी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील थंडीचा प्रकोपही काहीसा कमी होताना दिसत आहे. आठ दिवसांसाठी थंडीचा जोर कमी होणार असून, नागरिकांना गारठ्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरात जे वादळ तयार होत आहे, त्याचा थेट परिणाम स्थानिक हवामानावर दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावला आहे, तर त्याऐवजी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण हवेचा प्रवाह वाढला आहे. याचसोबत हवेतील आर्द्रतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे, आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका कमी राहील.


About Author

Rohit Shinde

Other Latest News