‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची, सिनेमाच्या टिमने घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट

केवळ कोकणातील लोकांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रानं ही कलाकृती मोठ्या पडद्यावर पाहायला हवी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. तसंच ‘दशावतार’नं मराठी चित्रपटाला भव्यता मिळवून दिली आहे.

Mumbai – सध्या बॉक्स ऑफिसवर ‘दशावतार‘ हा मराठी सिनेमा धूमाकूळ घालत आहे. दरम्यान, आज या सिनेमाच्या टिमने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत आणि कुठल्या दिशेनं चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. असे गौरवउद्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.

सगळ्यांचीच कामं उत्तम

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दशावतार ‘ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत ,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या. दरम्यान, सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकानं एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय. अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाची प्रशंसा केली.

कित्येक काळानंतर भव्य चित्रपट पाहिला

केवळ कोकणातील लोकांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रानं ही कलाकृती मोठ्या पडद्यावर पाहायला हवी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. तसंच ‘दशावतार’नं मराठी चित्रपटाला जी भव्यता मिळवून दिली त्याबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, सुबोध खानोलकर , ओंकार काटेसह ‘ दशावतार‘च्या सर्वच निर्मात्या मंडळींचे अभिनंदन उद्धव ठाकरे यांनी केलं. ‘दशावतार ‘ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कामाची उद्धव ठाकरे यांनी प्रशंसा केली. आपण कित्येक काळानंतर मराठीत असा भव्य चित्रपट पाहिला, ही भव्यता, हे सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवे.


About Author

Astha Sutar

Other Latest News