MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

देवेंद्र फडणवीसांची जाहिरात जनतेच्या प्रेमातून, विसर्जनानंतर राऊतांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का?, भाजपचा सवाल

Written by:Astha Sutar
देवेंद्रजींची जाहिरात सामनामध्ये आली नाही. म्हणून कदाचित तुमचं पोट दुखत असेल. उद्धव ठाकरे व राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सामनात येणाऱ्या जाहिराती काळ्या पैशातून येतात का? असा सवाल भाजपाने उपस्थित केलाय.
BJP Vs Sanjay Raut – आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तमान पत्रातील जाहिरातीवर विरोधकांनी  आणि खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली आहे. याला भाजपाने जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं आहे का?” असा सवाल भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केला. संजय राऊत आता हवेत बाण चालवू लागले आहेत. देवेंद्रजींच्या जाहिरातीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अशा जाहिराती सर्वसामान्य जनतेच्या प्रेमातून येतात. पण उद्धव ठाकरे व राऊत यांचा जनतेशी वा कार्यकर्त्यांशी काहीही संबंध नाही, त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

सामना काळ्या पैशातून चालतो का

दरम्यान, “विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचं संपूर्ण कॅम्पेन 40–50 कोटीत होतं आणि ते एका दिवसात झालं. असा हस्यास्पद दावा राऊंतांनी केला. त्यामुळे संजय राऊत हवेत अजून किती बाण सोडणार? खरं तर कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा देवेंद्रजींवर प्रेम आहे, त्यातूनच जाहिरात आली.” अस बन यांनी म्हटलं आहे. “राऊत यांनी काळ्या पैशाचा उल्लेख केला, परंतु सामना वृत्तपत्राचा कारभारच काळ्या पैशात चालत असल्याची शक्यता जास्त आहे. देवेंद्रजींची जाहिरात सामनामध्ये आली नाही. म्हणून कदाचित तुमचं पोट दुखत असेल. उद्धव ठाकरे व राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सामनात येणाऱ्या जाहिराती काळ्या पैशातून येतात का, हा माझा सवाल आहे.”

महाराजांबद्दल आमचं प्रेम खरं, तुमचं बेगडी

औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते आणि ज्यांची वैचारिक सुंता झाली असे संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये, असा जोरदार हल्ला नवनाथ बन यांनी चढवला. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करूनच केली जाते. डॉ. हेडगेवार यांनीही सांगितलं होतं की, व्यक्ती म्हणून आदर्श मानायचा असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच माना. त्यामुळे महाराजांचे नाव घेण्याचा आणि संघाला सल्ला देण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही.” अशी टिका बन यांनी राऊतांवर केलीय.