बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा आत्महत्येचा प्रयत्न; मृत पती महादेव मुंडेंना न्याय देण्याची आग्रही मागणी

बीडमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

बीडमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज याच आपल्या आग्रही मागणीसाठी आधी आत्मदहनाचा आणि नंतर विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. बीड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ही धक्कादायक घटना घडली. ज्ञानेश्वरी यांनी आपल्या नातेवाईकांसह  पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले होते. यावेळी, पोलीस अधीक्षकांसोबत त्यांची चर्चा देखील झाली. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेची मागणी

महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप केला जात आहे. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे यांची आज तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडेंना ताब्यात घेतले. 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही.  त्यामुळे संतप्त पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि नातेवाईकांकडून आरोपींच्या अटकेची आग्रही मागणी केली जात आहे.

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं काय?

व्यवसाय करणारे महादेव मुंडे यांची 21–22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयाच्या बाहेर धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजनुसार तपासाच्या दुसऱ्या दिवशी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. तपास सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत सुरू झाला, पण आरोपी कोण आहेत व हत्येचे कारण काय याबाबत पुरावा न मिळाल्यामुळे तपासाची प्रगती थांबली. तब्बल 18 महिन्यांनीही आरोपींना अटक नाही; पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप या प्रकरणात केला जात आहे. त्यामुळे महादेव मुंडे प्रकरणाचे गुढ मोठे आहे. याबाबत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्नी या नात्याने आता पाठपुरावा सुरू केला आहे. अशात त्यांना आत्मदहन आणि विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News