MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

चार दिवस नोंदणीसाठी बाकी असताना एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट किती जणांनी केली नोंदणी, आणखीन मुतदवाढ मिळणार?

Written by:Astha Sutar
दुसरीकडे नंबर प्लेट बदलण्यासाठी लोकांनी खूपच कमी प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे. म्हणजे अद्यापर्यंत 25 ते 30 टक्के गाड्यांचे नवीन नंबर प्लेट बसवलेत. त्यामुळं उर्वरित संख्या ही 70 टक्यांच्यावर असल्याचे बोललं जातेय.
चार दिवस नोंदणीसाठी बाकी असताना एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट किती जणांनी केली नोंदणी, आणखीन मुतदवाढ मिळणार?

Hsrp Number Plate : महाराष्ट्रात राज्य सरकारने ३० जूनपूर्वी सर्व गाड्यांचे एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात यावे, असं महाराष्ट्र परिवहन विभागाने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी २०१९ च्या अगोदरच्या सर्व वाहनांना नव्या नंबरप्लेट बसवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. दुचाकी आणि चारचाकी आणि नवीन नंबर प्लेट म्हणजे एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. याबाबत प्रत्येक राज्याला मुदत दिली होती. याबाबत ३० जून ही शेवटची तारीख दिली होती.

२१ जून ऑनलाईन नोंदणी…

दरम्यान, जर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत असली तरी त्यासाठी ऑनलाईन नोंदणी २१ जूनपर्यंत करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी यापूर्वी 31 मार्च 2025 ही तारीख दिली होती. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पण नंबर प्लेट बसविण्यासाठी लोकांमध्ये अजूनही संभ्रम दिसून येत आहे. याची ऑनलाईन नोंदणी अद्यापर्यंत कमी लोकांनी केल्याचे दिसून येत आहे.

नंबर प्लेट बदलण्यासाठी लोकांनी फिरवली पाठ

ऑनलाईन नोंदणीसाठी चार दिवस शिल्लक असताना आणि नंबर प्लेट बदण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अद्यापर्यंत गाड्यांचे नंबर प्लेट बदलण्यासाठी लोकांनी पाठ फिरवल्याते चित्र दिसत आहे. दरम्यान, सध्या किती जणांनी याची नेमकी नोंदणी केली याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र एक दोन दिवसात आकडेवारी येईल, असं प्रश्न परिवहन विभागातील अधिकारी यांनी सांगितले आहे. तसेच केवळ २५ टक्केच लोकांनी नंबर प्लेट बदलण्याचे आल्याचे सांगण्यात येत आहे.