MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

Cold Wave: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा अलर्ट; तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज

Written by:Rohit Shinde
महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून आज 7 जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे.
Cold Wave: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा अलर्ट; तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज

काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे.

उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला होता. आता डिसेंबरच्या मध्यावर हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. रविवार, 14 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घ्या…

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार !

महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून आज 7 जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. हवामानातील या बदलांमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यभरात थंडीची लाट पहायला मिळत आहे. थंडगार वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली आहे. यामुळे राज्याच्या अनेक भागांतील तापमानात कमालीची घसरण झाली आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील किमान तापमानातही मोठी घसरण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागांत हुडहुडी कायम राहणार असून पुढील काही दिवस थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांत थंडीची लाट कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे किमान तापमान सुमारे 11 अंश सेल्सियस, तर नांदेडमध्ये 13 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भात थंडीपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता असून किमान तापमानात सुमारे 2 अंश सेल्सियसवाढ होऊ शकते. नागपूरमध्ये किमान तापमान 14 अंश सेल्सियस, तर अमरावतीत सुमारे 13 अंश सेल्सियसराहण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि सोलापूरसाठी थंडीचा इशारा देण्यात आला असून पुण्यात किमान तापमान सुमारे 9 अंश सेल्सियस, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत थंडीचा इशारा देण्यात आला असून, जळगाव येथे किमान तापमान 10 अंश सेल्सियस, तर नाशिकमध्ये ते 11 अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

थंडीत हृदयाचे आरोग्य जपा !

थंडीत हृदयाचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे नियमित तपासणी करा. सकाळी लवकर थंडीत व्यायाम टाळून सूर्यप्रकाशात किंवा घरात हलका व्यायाम करा. उबदार कपडे घाला आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवा. आहारात ताज्या भाज्या, फळे, कमी मीठ व कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा. धूम्रपान व मद्यपान टाळा. पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी ठेवा. पाणी योग्य प्रमाणात प्या. कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.