Ganesh Naik – ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. ठाण्यात गणेश नाईक जनता दरबार घ्यायचे यानंतर तिथे शिंदेंच्या शिवसेनेनंही जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता मंत्री गणेश नाईका यांनी ठाणे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. ठाणे पालिकेत सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागेल, असा इशारा मंत्री गणेश नाईक यांनी विरोधकांना दिला आहे. भाजपाच्या सेवा पंधरवडा निमित्त ठाण्यातील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात आले असता, त्यावेळी बोलत होते.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांनी डिवचले
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना नाईकांनी डीवचले आहे. दुसरीकडे ठाण्यात पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या जागा वाटप तसेच तिकिट वाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता असताना आता थेट ठाण्यात येऊन गणेश नाईकांना शिंदेंना डिवचले आहे.
…तर युतीला विरोध करणारा पहिला मी असेन
दुसरीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आहे. पण या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही किंवा मनासारख्या जागा मिळाल्या नाहीतर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन, असेही मंत्री नाईक यांनी म्हणत युतीसाठी अप्रत्यक्षरित्या आपण विरोध करणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, भाजपाच्या सेवा पंधरवडा निमित्त ठाण्यातील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात मंत्री गणेश नाईक बोलत होते. या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदिप लेले, काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





