महिला अथवा तरूणींवरील अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत आता जळगावच्या भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका महिलेने चक्क आपल्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला प्रोत्साहन दिल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या मित्राने तिच्यासमोर तिच्या 17 वर्षीय मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
आईच्या मित्राकडून तरूणीचा विनयभंग
संबंधित मुलीचे वडिल भुसावळमधील नामांकित काॅन्ट्रॅक्टर असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मित्राने केलेल्या या कृत्याचे मुलीच्या आईने ही समर्थन केले. संतापलेल्या मुलीने थेट याप्रकरणी आईसह तिचा मित्राविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून मुलीच्या आईसह तिच्या मित्राविरुद्ध विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. मयूर शिंपी असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे.

वैतागलेल्या मुलीची पोलिसांत तक्रार आणि…
सावळ येथे अल्पवयीन मुलीचे वडील कॉन्ट्रॅक्टर असून वडील घरी नसताना आईचा मित्र मयूर शिंपी हा पिझ्झा घेऊन येण्याच्या बहाण्याने घरी आला होता. आरोपीने मुलीच्या पाठीवर हात फिरवत तिचा विनयभंग केला. एवढंच नाही तर टीव्ही बंद करण्याच्या बहाण्याने मिठीत घेतले, मात्र मुलीने यास विरोध करत संशयिताचे हात झटकले. त्यावेळी तिच्या आईने “बेटा तू मुलगी आहे, चालतंच” असं म्हणत मित्राच्या कृत्याचे समर्थन केले.
आईच्या मित्राकडून केले जात असलेले कृत्य आणि आईचे त्याला असलेले समर्थन याला वैतागून अल्पवयीन मुलीने या प्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईसह तिचा मित्र मयूर शिंपी याच्या विरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित मयूर शिंपी हा फरार झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास केला जात असून, यामध्ये आरोपीवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.











