MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Lalbaugcha Raja Darshan : लालबागच्या राजाला यंदा १ कोटी गणेशभक्त येणार? राजासाठी AI ची हायकेट सुविधा

Written by:Smita Gangurde
दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक लालबाच्या राजाच्या दर्शनाला येतात. यंदा हाच आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव काळात मुंबईत मोठ्या संख्येने भाविक येत असतात. गणेशोत्सवातील दहा दिवस मुंबईत गणेशभक्तांच्या उत्साहासह वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. मुंबईतील लालबागच्या राजाला केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. २४ ते ३० तास रांगेत थांबून बाप्पाचं दर्शन घेतलं जातं. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक लालबाच्या राजाच्या दर्शनाला येतात. यंदा हाच आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लालबाग राजा सार्वजनिक मंडळ आणि पोलिसांवर मोठी जबाबदारी असेल.

लालबागच्या दर्शनाला १ कोटी गणेशभक्त हजेरी लावणार?

तसं पाहता लालबागचा राजा स्थापन होतो तो परिसर खूप लहान आहे. त्यामुळे प्रत्यक्षात त्या भागात फार लोक मावू शकत नाही. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अगदी काही किलोमीटर अंतरापासून रांग सुरू होते. यंदा ही रांग अधिक लांब जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा राजाचं दर्शन घेणं सोपं असणार नाही.

मोठी गर्दी, धक्काबुक्की टाळण्यासाठी काय करणार?

एखाद्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमले असतील तर अशा ठिकाणी हॉटस्पॉट एनलिसिस करण्यात येईल. चेंगराचेंगरीची भीती असेल अशा ठिकाणचे एआय कॅमेरे लगेच याबाबत सूचित करतील. यानंतर पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं जाईल आणि ते गर्दीवर नियंत्रण आणतील. विशेष म्हणजे एआयच्या मदतीने कोणत्या वेळी कोणत्या रांगेत किती संख्या आहे हे अचूक कळू शकेल. त्यामुळे तातडीने खबरदारी घेणं सोपं जाईल.

कॅमेरा गुन्हेगारांना ओळखणार

गुन्हेगारांचा चेहरा ओळखणारे कॅमेरे ठिकठिकाणी बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या डेटाबेसमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अगदील दिल्लीतील गुन्हेगारांची माहिती भरण्यात आली आहेत. त्यामुळे नेमकी व्यक्ती पकडणं सोपं जाईल.