MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Written by:Astha Sutar
या अपघाताचा व्हीडिओ सोशल मीडियावर उद्योगपती गौतम सिंघानियाने शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुलाबाच्या दिशेने जाणाऱ्या लॅम्बोर्गिना या अलिशान कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळं ही कार दुभाजकावर जाऊन धडकली.
कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Coastal road accident – मु्ंबईकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळण्यासाठी मुंबईच्या सागरी किनारी कोस्टल रोडची निर्मिती करण्यात आली. कोस्टल रोडमुळं वेळेचे बचत आणि जलदगती प्रवास होतो, असं बोललं जातं. याच कोस्टल रोडचे बिग बी अभिताभ बच्चन यांनीही कौतूक केले होते. दरम्यान, याच कोस्टल रोडबाबत एक अपघाताची बातमी समोर येत आहे. कोस्टल रोडवर भरधाव वेगात असलेल्या लॅम्बोर्गिनी कारचा भीषण झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लॅम्बोर्गिनी कार कोण चालवत होते?

दुसरीकडे या अपघातानंतर कारला टो करण्यात आले आहे. कारचे बोनटचे प्रचंड नुकसान झाले आहे. वरळी पोलिसांनी आरटीओ कार्यालयाला कारची तपासणी करण्यास सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच मुंबईतील उच्चभ्रू नेपियन सी रोड या विभागातील राहणारे अतिश शाह हे लॅम्बोर्गिनी कार चालवत होते. शाह यांची कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अतिश शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस वरळी पोलीस स्टेशनचे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्ये यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

गौतम सिंघानियाकडून व्हिडीओ शेअर

दरम्यान, या अपघाताचा व्हीडिओ सोशल मीडियावर उद्योगपती गौतम सिंघानियाने शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुलाबाच्या दिशेने जाणाऱ्या लॅम्बोर्गिना या अलिशान कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळं ही कार दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात कारचालकाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या अपघातात कारचा समोरील काही भाग खिळखिळा झाला आहे. तसेच लॅम्बोर्गिनी या अलिशान कारचा अपघाताबाबत रेमंड लिमिटेड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी चिंता व्यक्त केली आहे.