Governor, Acharya Devvrat – सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल पद रिक्त होते. पण आता या ठिकाणी गुजरातचे आचार्य देवव्रत हे नवे राज्यपाल म्हणून उद्यापासून सुत्रे हाती घेणार आहेत. दरम्यान, आज महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्या समवेत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी, आदी अधिकारी उपस्थित होते.

उद्या होणार शपथविधी
दरम्यान, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच मुंबईत स्वागत झाल्यानंतर राज्यपाल देवव्रत यांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस विभागामार्फत मानवंदना देण्यात आली. दुसरीकडे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत हे १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पदाची सूत्रे स्वीकारून त्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे. यावेळी राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सी पी राधाकृष्णन हे नुकतेच उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या जागी आचार्य देवव्रत हे राज्यपाल पदाची सुत्रे स्विकारणार आहेत.
कोण आहेत आचार्य देवव्रत?
- आचार्य देवव्रत हे शिक्षणक्षेत्रात मोठं काम केलं आहे
- अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
- याआधी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही कार्य केलं आहे.
- २०१५ ते २०१९ या कालावधीत त्यांनी हिमाचल प्रदेशात राज्यपालपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.
- यानंतर त्यांची गुजरात राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.
- आता त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
- त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या कारभारावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











