MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

गणेशोत्सवात मराठा वादळ मुंबईत घेऊन येण्यावर मनोज जरांगे ठाम, कोर्टानं नाकारली परवानगी, आता पुढं काय?

Written by:Smita Gangurde
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारलाय., ऐन गणेशोत्सवात मराठी वादळ घेऊन मुंबईत धडकण्याची त्यांची योजना आहे. गणेशोत्सवात हे आंदोलन होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत.

मुंबई – मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटलांना हायकोर्टानं दणका दिलाय. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास जरांगेंना हायकोर्टाची मनाई केली आहे. खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत

कोर्टानं काय म्हटलंय?

गणेशोत्सवात मुंबईत रहदारीचा प्रश्न निर्माण होवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घातला येणार नाही. अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येत नाहीत. नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं

जरांगेंचा दिखावा, त्यांचा आत्मा राजकारणी- गुणरत्न सदावर्ते

मनोज जारंगेचं हे आंदोलन हे दिखावा आंदोलन आहे आणि आत्मा आहे तो राजकारणी आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी तेली आहगे. न्यायालयाचं जरांगे ऐकत नसतील तर पोलिसांना एफआयआर दाखल करावी लागेल, असंही सदावर्ते म्हणालेत. जरांगे यांना कोर्टाचं ऐकावचं लागेल, अ्संही सदावर्ते म्हणालेत.

जरांगे आंदोलनावर ठाम

जरांगे पाटलांचं वादळ 27 ऑगस्टला मुंबईकडे निघणार असून 29 ऑगस्टपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. यावेळी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ऐन गणेशोत्सवात भक्तांना मोठा अडचणींना सामना करावा लागू शकतो
दरम्यान, हिंदूंच्या सणांमध्ये खोडा घातल्यास छत्रपती शिवराय नि:पात करायचे असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. तर ७ कोटी मराठे मारून टाकून तुम्ही राजकारण करा, असं प्रतिआव्हान जरांगेंनी दिलंय.

मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची शिष्ठाई असफल

जरांगे पाटलांचा मोर्चा गणेशोत्सोवात मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक अंतरावलीत पोहोचले
राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली. पण ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मुंबईसाठी रवाना होणारचं असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलाय

आरक्षण उपसमितीची बैठक

जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत आरक्षण उपसमितीची बैठक झाली. कुणबी नोंदी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. जरांगेंच्या मागणीतील ही एक मागणी होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत.मात्र ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईकडे मोर्चा घेऊन येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत