मुंबई मेट्रोचे तिकिट 14 वेगवेगळ्या Ticketing Apps वर मिळणार; मुंबईकरांची रांगेतून सुटका

Rohit Shinde
मुंबई मेट्रोचे प्रवाशांसाठीचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. सतत वाढणारी लोकसंख्या, वाढता वाहतूक कोंडीचा ताण आणि लांब पल्ल्याचा प्रवास यामुळे मेट्रो हे शहरातील नागरिकांसाठी एक प्रभावी आणि जलद वाहतूक साधन ठरले आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि दररोज लाखो प्रवासी सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकतात. मेट्रोच्या विस्तारित मार्गांमुळे उपनगर ते शहर असे जोडणारे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. खरंतर प्रवाशांचा देखील मुंबई मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळतोय. अशा परिस्थितीत तिकिट काढणे अधिक सोयीस्कर व्हावे, यासाठी आणखी एक महत्वपूर्ण उपाययोजना करण्यात आली आहे.

मेट्रोचे तिकिट 14 वेगवेगळ्या Ticketing Apps वर

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आता तिकिट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. या दोन्ही मार्गिकेवरील तिकिटाची सुविथा आता 14 हून अधिक मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘मुंबई वन’ अ‍ॅप 3 लाखांहून अधिक प्रवाशांनी डाउनलोड केले असून आता One Ticket, RedBus, Yatri Rails यांसारख्या अ‍ॅपवर क्यूआर तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच पेटीएम, उबर आणि रॅपिडो वरही मेट्रो तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एमएमआरडीएच्या वतीने मेट्रो 2A (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि 7 (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेवरील प्रवाशांना विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. तिकीट खिडकीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी ई-तिकिटाची सोय आधीपासूनच उपलब्ध होती, परंतु आता या ही सुविदा अधिक व्यापक करण्यात आली आहे. या सुधारणांचा एक भाग म्हणून 8 ऑक्टोबर रोजी एमएमआरडीएने भारतातील पहिले एकात्मिक तिकीट ॲप ‘मुंबई वन’ कार्यान्वित केले होते. या ॲपला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत 3 लाखाहून अधिक प्रवाशांनी ते डाउनलोड केले आहे.

कोणत्या Apps वर मिळणार मेट्रोची तिकिटे ?

‘मुंबई वन’ ॲपसोबतच क्यूआर कोड आधारित तिकीट सुविधा 14 पेक्षा जास्त मोबाईल ॲप्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्यूआर आधारित तिकीट सुविधा देणाऱ्या ॲप्समध्ये वन तिकीट (One Ticket), रेड बस (Red Bus), रेड रेल (Red Rail), यात्री रेल्वेज (Yatri Railways), इझी माय ट्रिप (Easy My Trip), हायवे डीलाईट (Highway Delight) यांसारख्या ॲप्सचा समावेश आहे. याशिवाय एमएमडीआरएने भविष्यात आणखी विस्ताराचे संकेत दिले आहेत. लवकरच पेटीएम (Paytm), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या मोठ्या आणि लोकप्रिय ॲप्सवर देखील मेट्रो तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मुंबई मेट्रोला प्रवाशांचा सातत्याने जोरदार प्रतिसाद

मुंबई मेट्रोला प्रवाशांचा सातत्याने जोरदार प्रतिसाद मिळत आहे, कारण ती शहराच्या दैनंदिन वाहतुकीचा कणा बनत चालली आहे. वाढती गर्दी, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि लांबचा प्रवास यामुळे लोक मेट्रोकडे अधिक विश्वासाने वळताना दिसतात. मेट्रोच्या वेगवान, सुरक्षित आणि वेळेवर चालणाऱ्या सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो. स्वच्छ डबे, आधुनिक सुविधा, एसी व्यवस्था आणि तिकीटांच्या डिजिटल सुविधा यामुळे प्रवास आणखी सोयीस्कर बनतो. विविध लाईन्स सुरू झाल्याने उपनगर आणि मुख्य शहर यांची जोडणी अधिक मजबूत झाली आहे. पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह असल्यामुळे मुंबई मेट्रो आज लाखो प्रवाशांसाठी पहिली पसंती ठरत आहे.

ताज्या बातम्या