Sanjay Raut – पहलगाममध्ये दहशतवादी झाल्यानंतर पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाही. त्यामुळे पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना नको, असं म्हणत विरोधकांनी विरोध केला होता. तर रविवारचा सामना भारताने जिंकला असला तरी अजूनही या सामन्यावरून विरोधक सरकारवर टीका करताहेत. पाकिस्तानला जागतिक पातळीवर कर्ज मिळू नये. जर कर्ज मिळाले ते दहशतवादी कारवांयासाठी वापर करतील, असं पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने म्हटले होते. मग कालच्या मॅचमधून सुद्धा एक प्रकारे पाकिस्तानला आमच्या विरोध लढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आल आहे. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
दिड कोटीचा जुगार
दरम्यान, एक प्रकारे या मॅचमधून तुम्ही पैसा कमावत आहात. आमच्या 26 आया बहिणींचे कुंकू पुसले गेले आणि तुम्ही एका मॅचवर बहिष्कार टाकू शकत नाही? कालच्या मॅचमधून पाकिस्तानला एक हजार रुपये कोटी रुपये तुम्ही मिळवून दिलेला आहे. आणि जुगारातून १२५ हजार कोटी पाकिस्तानला मिळाले आहेत. त्यांना आर्थिक सक्षम करून तुम्ही आमच्या विरोध लढण्यास भाग पाडतात का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टिका केली. केवळ पैशासाठी केंद्र सरकार आणि जय शाह यांनी हा सामना खेळाडूंना खेळण्यास भाग पाडले. तर दीड लाख कोटीचा जुगार झालेला आहे.

अनेक माजी खेळाडू देखील सांगत होते की पाकिस्तानसोबत क्रिकेट नको, भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर सांगत होते की, क्रिकेट सामना खेळू नका. परंतु सरकारची सामन्याला परवानगी दिल्यामुळे कालची मॅच पाकिस्तानबरोबर खेळाडूंना खेळावी लागली.
चिकटवलेले मुख्यमंत्री…
शरद पवार हे टोलेजंग व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणानंतर हे मोठे व्यक्तिमत्व आहे. आणि ते लोकनेते आहेत. स्वतःच्या कर्तुत्वावर मोठे झाले आहेत. तुमच्यासारखे चिकटवलेले मुख्यमंत्री नाहीत. तुम्हाला पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्रीपदावर चिकटवलेले आहे. जसं सरकारी नोकरीत लोकांना चिकटवले जाते, तसं तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर चिकटवले आहे, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
तर दुसरीकडे संजय राऊत यांच्यावर भाजपाने पलटवार केला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुदेशांमध्ये क्रिकेट खेळू नये, अशी भूमिका घेणारे संजय राऊत कोण? किंवा त्यांचा बोलण्याचा अधिकार काय आहे? उद्यापासून ते म्हणतील की मला महाराष्ट्रात आले पाक यावरही बंदी आलेली आहे, असा खोचक टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना लगावला
तुम्ही आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवू नका….
दुसरीकडे कालच्या मॅचमधून भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूसोबत हस्तांदोलन केले नाही. याच्यात मोठं कौतुक नाही. हे मोदींची नवटंकी आणि युवरचनेचा एक भाग आहे. खेळाडूनी हस्तांदोलन केलं नाही याच्यात मोठं कौतुक नाही. पाकिस्तानकडून दहशतवादी कार्यवाही होत आहे. आमची माणसे मारले जात आहेत… आणि तुम्ही एका मॅचवर बहिष्कार टाकू शकत नाही. अशा मॅचवर आम्ही थुंकतो आणि शिंदेनी आम्हाला देशभक्ती किंवा राष्ट्रप्रेम शिकवु नये. त्यांनी पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावणे बंद करावे. त्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावं. असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.











