MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंचा निवडणूक आयोगावर संताप; राज ठाकरेंनी केली मोठी मागणी

Written by:Rohit Shinde
महाराष्ट्रात विरोधकांनी निवडणूक आयोग आणि मतदार यादांच्या विरोधात मोहिम उघडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ठाकरे बंधूंनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळाची 15 ऑक्टोबर पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली.

राज ठाकरेंची आक्रमक भूमिका

सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत जाहीर करण्यात आलेला निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकला अशी मोठी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नसल्याचे सांगा असही राज ठाकरे म्हणाले. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. निवडणुका लढवतं राजकीय पक्ष, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही असे म्हणत आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच असल्याचंही राज‌ म्हणाले.

राज ठाकरेंचा जोक चर्चेचा विषय

राज ठाकरे म्हणाले की, 2024 मधील निवडणुकीची मतदार यादीमधील छोटासा तपशील वाचून दाखवतो. यामधून तुम्हाला किती घोळ आहे, याचा अंदाज येईल. मतदारसंघ कांदिवली पूर्व, नाव-  धनश्री कदम,  वडिलांचं नाव- दिपक कदम- वय 23 वर्षे…आता नाव दिपक कदम, वडिलांचं नाव-दिपक रघुनाथ कदम, वय-117 वर्षे…मतदार संघ 161 चारकोप- नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव- महेंद्र चव्हाण, वय-124 वर्षे, महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव- महेंद्र श्रीनाथ चव्हाण, वय-43 वर्षे…यावरुन कोणी कोणाला काढलंय हेच समजत नाहीय, असं राज ठाकरे म्हणाले.

ठाकरे बंधूंनी एकीकडे राज्य निवडणूक आयोगाकडे जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली तर, दुसरीकडे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नाही. बाळासाहेब थोरात देखील पत्रकार परिषदेत बोलले. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.