नरेश मस्केंच्या खासदारकीला आव्हान देणारी राजन विचारेंची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने सुनावणीत काय म्हटलेय?

मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे, पक्षाकरिता लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत; पक्षाकरिता आंदोलन केली आहेत आणि ज्या गुन्ह्याला ते कोर्टामध्ये घेऊन गेले होते. त्यामध्ये कोर्टाने त्यांनाच चपराक दिली आहे.

Naresh Mhaske – ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. म्हस्के यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देत शिवसेना (उबाठा) चे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलीय. त्यामुळं म्हस्के यांना दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांना 7 लाख 34 हजार 231 मतं मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि माजी खासदार राजन विचारे यांना 5 लाख 17 हजार 220 मतं मिळाली होती.

याचिका का दाखल केली?

दरम्यान, निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप करीत राजन विचारेंनी हायकोर्टात त्यांच्याविरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. या याचिकेतून त्यांनी नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करीत आपल्याला खासदार म्हणून घोषित करण्याची मागणी याचिकेतून केली होती. मात्र कोर्टांने याचिका फेटाळून लावली आहे. यानंतर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्या खासदारकीवर शिक्का मोर्तब झालेले आहे. माझी खासदारकी कधी गेली होती? सात लाख चौतीस हजार मतदान मला या मतदारसंघात पडले होते. दोन लाख सतरा हजाराच्या फरकांनी समोरचा उमेदवार पराभूत झाला होता.

देशातून सर्वात मोठी लीड

माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब, कोणीतरी एखादा आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून चेहरा कसा लपवायचा, स्वतःचं फेस सेविंग कसं करायचं याकरिता कुठल्यातरी थातूरमातूर कारणावरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात असं बोललं जात होत. पण लोकांच्या दरबारात मी देशातील पहिल्या 10 मतदारसंघांमध्ये मी निवडून आलो आहे. राजन विचारेंना स्वतःची हार पचवता आली नाही. उबाठाला हार पचवता आली नाही. दिघे साहेबांचा शिष्य कोण? असा प्रश्न लोकांना त्यांनी टाकला होता. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार हेच दिघे साहेबांची शिष्य आहे हे ठाणेकरांनी दाखवून दिले आहे. तसेच देशातून सर्वात मोठी लीड मिळालेली जागा त्या पहिल्या 10 जागांमधील ठाण्याची ही एक जागा आहे. असं म्हस्के यांनी म्हटले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News