MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

पालिका निवडणुकांच्या धरतीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर, २१ जणांच्या चमूत कोणाला संधी?

Written by:Astha Sutar
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कार्यकारी समिती तयार करण्यात आलेय. निवडणुकीबाबत या समितीकडून महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. २१ जणांच्या कार्यकारी समितीत ३ महिलाचांही समावेश आहे.

Shivsena : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी आणि रणनीती आखली जात आहे. दरम्यान याचाच एक भाग म्हणून शिवसेना (शिंदे) वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे.

२१ जणांमध्ये कोणाकोणाची वर्णी?

दरम्यान, यामध्ये माजी आमदार यामिनी जाधव, महिला नेत्या मीनाताई कांबळी आणि विधान परिषद, आमदार मनिषा कायंदे यांना संधी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे राजकारणापासून लांब असलेले माजी मंत्री रामदास कदम हे ही या समितीत आहेत. तसेच माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनाही संधी देण्यात आलेली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ही कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. निवडणुकीबाबत या समितीकडून महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच या २१ जणांच्या कार्यकारी समितीत तीन महिलाचांही समावेश आहे.

कशी असणार शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते
२) रामदास कदम, नेते
३) गजानन कीर्तीकर, नेते
४) आनंदराव अडसूळ, नेते
५) मीनाताई कांबळी, महिला नेत्या
६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
७) रवींद्र वायकर, खासदार
८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार
९) राहुल शेवाळे, माजी खासदार
१०) संजय निरुपम, माजी खासदार
११) प्रकाश सुर्वे, आमदार
१२) अशोक पाटील, आमदार
१३) मुरजी पटेल, आमदार
१४) दिलीप लांडे, आमदार
१५) तुकाराम काते, आमदार
१६) मंगेश कुडाळकर, आमदार
१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
१८) सदा सरवणकर, माजी आमदार
१९) यामिनी जाधव, माजी आमदार
२०) दीपक सावंत, माजी आमदार
२१) शिशिर शिंदे, माजी आमदार