बीडच्या परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT स्थापन होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश डीजीपींना देण्यात आले आहेत.

बीडमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे. अशा परिस्थितीत आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश डीजीपींना देण्यात आले आहेत.

महादेव मुंडे प्रकरणात SIT स्थापन होणार!

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान, हत्येबद्दल ऐकताना मुख्यमंत्री भावूक झाले, असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, “मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटीमध्ये ते साहेबांनी तत्काळ त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करतील.” मुख्यमंत्र्यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस प्रशासनाकडून तपासात अडथळा आणला गेल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.

परळीतील एका बंगल्यातून फोन आल्याने तपास थांबवला गेला, असे त्यांना कळाल्याचे त्यांनी सांगितले. हा फोन वाल्मिका कराडांचा होता, जो परळीतील एका बंगल्याचा कारभार सांभाळतो. आरोपींची नावे मुख्यमंत्र्यांना गोपनीय पद्धतीने देण्यात आली आहेत. एसआयटीमार्फत आरोपींची नावे जाहीर करून त्यांना तत्काळ अटक केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारीही सहभागी आहेत का, याचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतर महादेव मुंडे यांचे खुनी १०० टक्के सापडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं काय?

व्यवसाय करणारे महादेव मुंडे यांची 21–22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयाच्या बाहेर धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजनुसार तपासाच्या दुसऱ्या दिवशी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. तपास सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत सुरू झाला, पण आरोपी कोण आहेत व हत्येचे कारण काय याबाबत पुरावा न मिळाल्यामुळे तपासाची प्रगती थांबली. तब्बल 18 महिन्यांनीही आरोपींना अटक नाही; पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप या प्रकरणात केला जात आहे. त्यामुळे महादेव मुंडे प्रकरणाचे गुढ मोठे आहे. याबाबत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्नी या नात्याने आता पाठपुरावा सुरू केला आहे. अशात त्यांना आत्मदहन आणि विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News