MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

७५ महिन्यातील सर्वाधिक मान्सून लवकर यावर्षी दाखल, हवामान विभागाचा अलर्ट कुठे?

Written by:Astha Sutar
मुंबई, उपनगर तसेच राज्यातील अनेक भागात रविवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सर्व ठिकाणी पाऊस बरसत आहे. आता सर्वंत्र लवकरच पाऊस दाखल होणारेय.

State Rain – आज मान्सून मध्य महाराष्ट्रातील पुण्यात दाखल झाला आहे. तर मराठवाड्यात उस्मानाबाद पर्यंत मान्सून दाखल झाला आहे. यावर्षी 26 मे रोजीच महाराष्ट्रात मान्सून दाखल आहे. गेल्या 75 महिन्यातील सर्वाधिक लवकरच यावर्षी मान्सून दाखल झालेला आहे. असं प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा येथील हवामान तज्ञ शुभांगी भुते यांनी म्हटले आहे.

लवकरच मान्सून राज्यभर…

दुसरीकडे मुंबईत आणि महाराष्ट्रात ७ जून किंवा ११ जून रोजी मान्सून दाखल होतो. मुंबईसह महाराष्ट्रात दरवर्षी 11 जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु यावर्षी लवकर म्हणजे 26 मे रोजीच मान्सून दाखल झालेला आहे. परंतू यावर्षी मुंबईसह राज्यातील मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल झाला आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील सर्वंत्र भागात मान्सून दाखल होईल, असंही हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

उद्या मुंबईत रेड अलर्ट…

दरम्यान, एकूणच पावसाची सद्य परिस्थिती पाहता, मुंबई, कोकणातील रायगड, ठाणे या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 7 मे रोजी मंगळवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 27 मे रोजी मंगळवारी मुंबईसाठी ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, हवामान तज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे.