महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महायुती सरकारने जीव घेतला, काँग्रेसचा राज्य सरकारवर प्रहार

महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फुट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय. अशी बोचरी टिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली. 

Congress – शेतकऱ्यांना कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भात ७०७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सत्तेसाठी ह्या सरकारने भोळ्या – भाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मते मिळवली. पण शेतकऱ्यांना मिळालं काय तर कर्जमाफीसाठी समिती. असा प्रहार काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर टिका केली आहे.

हे सरकार गेंड्याच्या कातडीचं

दरम्यान, अतिवृष्टीने आता शेतकरी उद्ध्वस्त झाला. हातातलं पिकं गेलं, बँका कर्ज देत नाहीत. हतबल होऊन शेतकरी टोकाचं पाऊल उचलतोय. पण सरकारला काही देणंघेणं नाही. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फुट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय. अशी बोचरी टिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली.  शेतकरी मेला, कुटुंब उद्ध्वस्त झालं तरी यांना लाज नाही. कृषी खात्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना टॅब द्यायचे का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत. असं वडेट्टीवार म्हणाले.

विश्वासघातकी महायुती सरकार

दुसरीकडे शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली राज्यातील महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी कायदा आहे. या अत्याचारी जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीने राज्यभर निषेध आंदोलन करत आहे. हा अन्यायकारक कायदा रद्द करा,अशी मागणी केली. तसेच हे सरकार म्हणजे विश्वासघातकी महायुती सरकार आहे. कृषी हे खाते शेतकऱ्यांसाठी काम करते का? शेतकरी आत्महत्यांसाठी थेट जबाबदार कोण असेल तर ते म्हणजे असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार असल्याची हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर सरकारवर केला


About Author

Astha Sutar

Other Latest News