state cabinet meeting – मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र बैठक संपल्यानंतर आयत्या वेळी आलेल्या प्रश्नावरुन महायुतीतील मंत्र्यांनीच अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून नाराजी व्यक्त केली. याआधीही शिवसेना शिंदे गटाच्या मंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबत निधीवरुन एकनाथ शिंदेंकडे तक्रार करत नाराजी व्यक्त केली असताना, आता भाजपाच्या एका मंत्र्यांनीही निधीवरुन नाराजी व्यक्त केली असल्याची खमंग चर्चा मंत्रालयाच्या आवारात होत आहे.
नेमक काय घडलं?
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा होत होती. यावेळी राज्याचे मार्केटिंग फेडरेशनचे विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांनी थेट अजित पवार यांच्या खात्याकडून निधी मिळाल नसल्याची तक्रार केली. एवढेच नाही तर आमच्याकडून पाठवलेला कामाच्या निधीचा प्रस्ताव अजून अर्थ खात्याने प्रस्ताव पाठवूनही अर्थ खात्याकडून मंजूर केला नाही, असा आरोप मंत्री जयकुमार रावल यांनी केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्केटींग फेडरेशनच्या प्रस्तावाबाब अर्थ खाताच्या खर्च (एक्सपेंडिचर) विभागातील आयएएस अधिकाऱ्याला तातडीने बैठकीत हजर राहण्याचे फर्मान सोडले.

एवढेच नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आले. त्यावर आयएएस अधिकारी तसेच संबंधित अधिकारी लगबगीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर झाले. अधिकारी येताचा मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची भडीमार सुरु केली. त्यावर मार्केटींग फेडरेशनच्या मंत्री कार्यालयाकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे आयएएस अधिकारी आणि अधिकारी यांनी सांगितले.
…अन् मंत्र्याला कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली
त्यावर संबधित मंत्र्याने त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. मात्र त्या अधिकाऱ्याच्या खुलाश्याने संबधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर अवाक होण्याची पाळी आली. ज्या फाईली-प्रस्ताव मंजूर केला जात नाही. म्हणून मंत्र्याने वित्त विभागाच्या आयएएस अधिकाऱ्याला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना पाचारण करायला भाग पाडले. त्या मंत्र्याच्या स्टाफनेच अद्याप प्रस्ताव तयार केला नसल्याचा खुलासा केला. तसेच तो प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचे उत्तर देताच संबधित खात्याच्या मंत्र्याला कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर या खमंग घटनेची चांगलीच चर्चा मंत्रालयात परिसरात सुरु असल्याचे ऐकायला मिळत आहे.