संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची बोचरी टिका

Astha Sutar

Anand Paranjape – टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत आज पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यावरुन भारत-पाकिस्तान मॅचला विरोधकांकडून विरोध होत असताना दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आलं आहे. तर सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आधी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टिका करणार्‍या संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध करायचाच असेल तर पहिल्यांदा त्यांनी एमसीए सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा घ्यावा, असं आव्हान परांजपे यांनी दिलं आहे. तसेच संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशभक्तीच्या कुठल्याही सर्टीफिकेटची गरज नाही

शिवसेना उबाठाच्या रॅलीमध्ये… विजयोत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले. याचे उत्तर संजय राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा द्यावे, असे खडेबोल सुनावतानाच आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याचा विरोधच करायचा असेल तर पहिल्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (एमसीए) सदस्य असलेले शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा पहिल्यांदा घ्यावा. असे थेट आव्हानच आनंद परांजपे यांनी दिले. संजय राऊतसारख्या बिनडोक माणसाकडून अजितदादा पवार यांना देशप्रेमाची… देशभक्तीच्या कुठल्याही सर्टीफिकेटची गरज नाही असा स्पष्ट इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या