MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर; निवडणुकांची राजकीय मोर्चेबांधणी ?

Written by:Rohit Shinde
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर आहेत. ही निवडणुकांच्या अनुषंगाने केली जाणारी मोर्चेबांधणी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर आहेत. सकाळी ११ वाजता अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल कँसर इंस्टिट्यूटमधील स्वस्तिक भवनचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूरात नॅशनल कँन्सर इंस्टिट्यूट उभारले आहे. मात्र शाहांच्या स्वागताची नागपूर भाजपने केलेली जय्यत तयारी लक्षात घेता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा स्थानिक नेत्यांना कोणता कानमंत्र देतात या कडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने काल रात्री नागपूरला पोहोचले. शाह आज अनेक कार्यक्रमांमध्ये
सहभागी होतील. गृहमंत्री शाहांचे नागपूरमध्ये आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी
त्यांचे स्वागत केले.

असा आहे दौरा

केंद्रीय गृहमंत्री शाह जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत ‘स्वस्ती निवास’ या अतिथीगृहाची पायाभरणी करतील. दुपारी ते कामठी तालुक्यातील चिंचोली येथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या तात्पुरत्या कॅम्पसचे उद्घाटन करतील आणि त्याच्या कायमस्वरूपी कॅम्पसची पायाभरणी करतील.यानंतर ते नांदेडला जातील आणि आनंद नगरमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. या कार्यक्रमानंतर, ते तेथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील आणि त्यानंतर शंकरराव चव्हाण स्मारकाच्या कुसुम सभागृहात एक सभा घेतील. आज दुपारी  3 वाजता शाह एका सभेला संबोधित करणार आहेत.

दौऱ्याला राजकीय महत्व

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यात महापालिका निवडणुकांना विशेष महत्व असणार आहे. नागपूर आणि नांदेड या महत्वाच्या महानगरपालिका आहेत. अशा परिस्थितीत शाहांच्या दौऱ्याला राजकीय किनार असल्याचं बोललं जात आहे. शाह आज भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील संबोधित करणार आहेत. ते नेमका काय कानमंत्र देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.