2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उद्या निकाल अपेक्षित; साध्वी प्रज्ञासिंहचे काय होणार?

मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. उद्या मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता...

मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. उद्या मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे न्यायलय या प्रकरणात नेमका काय निकाल देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जवळपास 17 वर्षांपासून हा खटला न्यायालयात असल्याने अनेकदा या प्रक्रियेवर टीका देखील झाली होती.

साध्वी प्रज्ञासिंह आरोपी होण्याचे कारण?

मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉमस्फोटात 6 निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र जो हादरून गेला होता. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

तेव्हा मालेगावात नेमकं काय घडले?

२००८ मालेगाव बॉम्बस्फोट ही भारताच्या इतिहासातील एक गंभीर आणि वादग्रस्त घटना होती. २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एक स्फोट झाला. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० लोक जखमी झाले. स्फोट एक मोटरसायकलमध्ये लपवलेल्या बॉम्बमुळे झाला होता.

सुरुवातीला यामागे इस्लामी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय होता, परंतु तपास पुढे गेला तसं हिंदू अतिरेक्यांचा सहभाग समोर आला. तपास यंत्रणांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, आणि इतर काही लोकांना अटक केली. हे प्रकरण भारतात ‘हिंदू अतिरेकी गटां’च्या संकल्पनेवर प्रकाश टाकणारे ठरले. या प्रकरणाची चौकशी एटीएस (Anti-Terrorism Squad) आणि नंतर NIA (National Investigation Agency) यांनी केली.

या घटनेमुळे देशभरात राजकीय खळबळ उडाली आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढले. अटक केलेल्या आरोपींवर अनेक वर्षे खटला चालू राहिला. काही आरोपींना जामीनही मिळाला. आजही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून समाजात या घटनेबाबत तीव्र भावना आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाने भारतात दहशतवादाच्या स्वरूपावर आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रभाव टाकला.

न्यायलयाच्या निकालाकडे देशाचे लक्ष

मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर सुरुवातीला एटीएस आणि नंतर एनआयए कडे याचा तपास वर्ग करण्यात आला होता. 17 वर्षापासून मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वीच संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या सात जणांना एनआयएने मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी न्यायालयाकडे केली होती. आता उद्या या खटल्याचा निकाल येण्याची शक्यता आहे. मालेगावसह संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News