एक ठिणगी अन् प्रवाशांनी भरलेली बोट धडाधडा पेटली; 148 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा Video

Smita Gangurde

Congo River boat accident : कांगो नदीमध्ये झालेल्या भयंकर दुर्घटनेमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 148 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर 12 हून अधिक प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. आफ्रिका खंडातील दुसरी सर्वात मोठी नदी कांगो येथे ही दुर्घटना घडली. ही नदी मध्य आफ्रिकेतून वाहते. या नदीचा अधिकांश भाग डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये येतो.

हा अपघात मंगळवारी घडला. कांगो नदीमध्ये लाकडाच्या एका मोटरबोटल अचानक आग लागली. आग लागल्याच्या पुढील काही क्षणात मोटरबोट पलटली. ही बोट मतानकुमु बंदरातून रवाना झाली होती आणि बोलोंबाच्या दिशेने जात होती.

स्वयंपाकादरम्यान लागली आग…

नदी सुरक्षा विभागाचे अधिकारी कॉम्पिटेंट लोयोको यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये एका महिला स्वयंपाक करीत होती. त्यादरम्यान एका ठिणगीमुळे पाहता पाहता संपूर्ण बोटीभर आग पसरली. या भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोटीला आग लागताच अनेकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी नदीत उड्या मारल्या. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बोटीत तब्बल 500 प्रवासी होते. आग पसरताच बोटीत गोंधळ उडाला. अनेकांनी नदीत उड्या मारल्या. पोहता येत नसणाऱ्यांनीही नदीत उडी घेतली. यामुळे अनेकांना बुडून मृत्यू झाला.

प्रवासी जिवंत जळाले…

या अपघातात अनेक प्रवासी जिवंत जळाले. वेळेत मदत न मिळाल्याने अनेकांचा बोटीतच मृत्यू झाला. मदत पोहोचेपर्यंत तब्बल 140 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांना जवळील एका शिबिरात हलविण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या