जपानला 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के; किनारी भागांमध्ये त्सुनामीचा धोका, सतर्कतेचा इशारा

Rohit Shinde

जपानच्या उत्तर किनाऱ्यावर रविवारी 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्सुनामीचा इशारा दिला. किनारपट्टी भागातील लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. तर, मॉनिटरिंग एजन्सी संभाव्य लाटांची उंची आणि नुकसानीचा अंदाज घेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जपानच्या हवामान एजन्सीच्या सुरुवातीच्या अहवालात सोमवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 असल्याचे म्हटले आहे. हा भूकंप आओमोरी आणि होक्काइडो किनाऱ्याजवळ झाल्याचे एजन्सीने सांगितले.

जपानच्या किनारी भागाला त्सुनामीचा धोका

सोमवारी 8 डिसेंबर रोजी उत्तर जपानमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. जपान हवामानशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या शक्तिशाली भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचा धक्का आओमोरीजवळील होक्काइडोच्या किनाऱ्यावर बसला असून त्याचे केंद्रबिंदू समुद्रतळापासून सुमारे 50 किमी म्हणजेच 30 मैल खाली होते. या प्रदेशात 3 मीटर उंचीच्या संभाव्य त्सुनामीच्या लाटांचा इशारा जारी करण्यात आला आहे.

हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री 11:15 वाजता देशाच्या किनाऱ्यापासून सुमारे 44 मैल अंतरावर आणि सुमारे 33 मैल खोलीवर झाला. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप आओमोरी आणि होक्काइडोच्या किनाऱ्यावर झाला. भूकंपानंतर या भागात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला असून 10 फूट उंचीच्या त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे.एजन्सीने म्हटले की, इशिकावा प्रीफेक्चर आणि आजूबाजूच्या परिसरांना सर्वाधिक धोका आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे संपूर्ण प्रदेशात भीती पसरली आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

सार्वजनिक प्रसारक NHK ने वृत्त दिले आहे की परिसरातील अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये सुरक्षा तपासणी केली जात आहे. एजन्सीने रहिवाशांना ताबडतोब उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आणि किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. टीव्ही चॅनेलवर आपत्कालीन सूचना सतत प्रसारित केल्या जात आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, परंतु मदत संस्था सतर्क आहेत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.

त्सुनामीचा धोका निर्माण झाल्यास नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक असते. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. किनारी भागातील रहिवाशांनी तात्काळ सुरक्षित उंच भागात स्थलांतर करावे आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावे. अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये; केवळ अधिकृत इशारे आणि अपडेट्सवर अवलंबून राहावे. आवश्यक वस्तू, औषधे आणि दस्तऐवजांसह आपत्कालीन किट तयार ठेवणे महत्त्वाचे आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाणे, लाटा पाहण्यासाठी थांबणे किंवा फोटो-व्हिडिओ काढणे धोकादायक ठरू शकते. सतर्कता, सावधगिरी आणि वेळेवर घेतलेली खबरदारी जीव वाचवू शकते.

ताज्या बातम्या