बिजिंग- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 7 वर्षांनंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची बिजिंगमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत पंतप्राधन मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.
दहशतवाद हा जागतिक प्रश्न असल्याचं सांगत, या मुद्द्यावर चीननं भारताला साथ द्यावी, असं आवाहन मोदी यांनी चीनच्या राष्ट्रपतींना केलंय. भारत आणि चीनमध्ये सहकार्य झाल्यास 2.8 अब्ज नागरिकांना त्याचा फायदा होईल, असंही मोदी म्हणालेत. 2026 साली भारतात होणाऱ्या ब्रिक्स समिटचं निमंत्रणही यावेळी राष्च्रपती शी जिनपिंग यांना देण्यात आलं.

ड्रगॅन आणि हत्तीनं एकत्र यावं- जिनपिंग
या भएटीवेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हेही सकारात्मक दिसले. ड्रॅगन आणि हत्तीनं एकत्र यावं, असं आवाहन जिनपिंग यांनी या भेटीवेळी केल्याची माहिती आहे. या भेटीमुळे हिंदी-चिनी भाई भाईचा नारा पुन्हा बुलंद होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. अमेरिकेनं टेरिफ आकारल्यानंतर मोदी आणि जिनपिंग यांची भेट जागतिक राजकारणात महत्त्वाची मानण्यात येतेय.
गलवान चकमकीनंतर मोदींचा पहिला दौरा
शनिवारी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी चीनमध्ये दाखल झाले. जून 2020 मध्ये गलवान परिसरात दोन्ही देशांतील सैन्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या सीमेवरील वाद कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा असल्याचं सांगण्यात येतंय.
तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाई सहयोग संघटनेच्या मिटिंगमध्येही पंतप्रधान मोदी सहभागी झाले. या समिटमध्ये 20हून अधिक देश सामील झाले आहेत. मोदी, पुतीन यांच्यासह मध्य आशिया, मध्य पूर्व, दक्षिण आशियातील देशांचे नेते या समिटमध्ये उपस्थित आहेत. सोमवारी मोदी आणि पुतिन यांचीही भेट होणार आहे.











