हज आणि उमराह यात्रेमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Jitendra bhatavdekar

१७ नोव्हेंबर २०२५ रोजी सौदी अरेबियात एक मोठा अपघात झाला. भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता, मक्काहून मदीनाला जाणाऱ्या उमरा यात्रेकरूंची बस मुफ्रीहाटजवळ एका डिझेल टँकरशी धडकली. या अपघातात ४२ भारतीय यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, उमरा यात्रेबद्दल अधिक जाणून घेऊया.

उमराहचे महत्त्व

उमराह ही सौदी अरेबियातील मक्का येथील एक पवित्र तीर्थयात्रा आहे. इस्लाममध्ये याला खूप आदर आहे. उमराहला लहान हज म्हणूनही ओळखले जाते. त्याचे आध्यात्मिक महत्त्वही खूप आहे. हज हा फक्त इस्लामी महिन्यातील धु अल-हिज्जाच्या विशिष्ट दिवसांतच करता येतो, तर उमराह हा वर्षाच्या कोणत्याही वेळी करता येतो.

उमरा आणि हजमधील फरक

उमराह म्हणजे काय?

इस्लाम धर्मातील मक्केच्या पवित्र तीर्थयात्रेला उमराह म्हटले जाते. उमराह ही एक ऐच्छिक यात्रा असते. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने उमराह केलेच पाहिजे असे बंधन नसते. ही यात्रा १५ दिवसांची असते. या यात्रेत लोक आपला अल्लाहवरील विश्वास मजबूत करण्याचा आणि आपल्या पापांचे प्रायश्चित करण्याचा प्रयत्न करतात. या यात्रेत ‘काबा’च्या भोवती फेऱ्या माराव्या लागतात. ज्या लोकांची ही प्रदक्षिणा पूर्ण होते, त्या लोकांची उमराह यात्रा मंजूर झाली किंवा यशस्वी झाली असे समजले जाते.

हज आणि उमराह यात्रेमधील नेमका फरक काय?
इस्लाम धर्मानुसार सांगायचे तर हज यात्रा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी बंधनकारक असते. शारीरिक-आर्थिकदृष्ट्या सशक्त लोकांना आयुष्यात एक वेळ तरी ही यात्रा करणे अनिवार्य असते. मात्र उमराह यात्रा ऐच्छिक असते. प्रत्येक व्यक्तीने ही यात्रा करायलाच हवी असे बंधन नसते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हज यात्रा तब्बल ४० दिवसांची असते तर उमराह यात्रा १५ दिवसांची असते. उमराह वर्षभरात कधीही केले तरी मान्य असते. मात्र हज इस्लामिक कॅलेंडरनुसार एका ठराविक काळातच करण्याची प्रथा आहे.

मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीकडे खरंच वेळ नसेल तर तो व्यक्ती २ तासातसुद्धा उमराह पूर्ण करू शकतो. मात्र हज यात्रेच्या बाबतीत असे नसते. हज यात्रेसाठी ४० दिवसांचा ठराविक काळ आवर्जून देणे गरजेचे असते. मात्र या दोन्ही यात्रांमध्ये मुस्लिम बांधव जगातील सुखसुविधा ऐषाराम सोडून आपल्या पापांचे प्रायश्चित करत असतात. आणि अगदी मनापासून नमाज, कुराण पठण करत अल्लाहची प्रार्थना करतात.

ताज्या बातम्या